कायास्थैर्यम
संस्कृत मध्ये काया म्हणजे शरीर आणि स्थैर्यम म्हणजे स्थिरता किंवा स्तब्धता प्राप्त करणे.
काया स्थैर्यम म्हणजे शरीराला स्थिर करण्याचा सराव करणे. शरीर, मन आणि बुद्धी यांचा परस्पर संबंध असतो. शरीर स्थिर केल्यास मन, ज्याला शांत करणे कठीण असते, शांत होते आणि त्यामुळे बुद्धीही शांत होण्यासाठी मदत मिळते. शरीर, मन, बुद्धी या तिन्हीची एकत्रित शांतता वैश्विक शांततेशी सुलभतेने जोडली जाते.
या आंतरिक शांती शिवाय ध्यानाची उच्च व सूक्ष्म प्रक्रिया सुरू होत नाही. याच कारणासाठी जुन्या काळी, गुरुकुलमध्ये या प्रथेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात होते. त्या काळात विद्यार्थ्यांना प्रथम ही प्रथा शिकवली जात होती.
काया स्थैर्यम म्हणजे शरीराला स्थिर करण्याचा सराव करणे. शरीर, मन आणि बुद्धी यांचा परस्पर संबंध असतो. शरीर स्थिर केल्यास मन, ज्याला शांत करणे कठीण असते, शांत होते आणि त्यामुळे बुद्धीही शांत होण्यासाठी मदत मिळते. शरीर, मन, बुद्धी या तिन्हीची एकत्रित शांतता वैश्विक शांततेशी सुलभतेने जोडली जाते.
उद्देश
शरीर, मन आणि बुद्धीला स्थिर करणे
प्रक्रिया
शांतचित्ताने सुलभ आसनात बसावे.
शरीराला शिथिल करावे.
डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत आपले लक्ष केंद्रित करावे.
तुम्ही झाड आहात आणि पाय रोवून उभे आहात अशी कल्पना करा. तुमचे शरीर झाडाच्या खोडासारखे आहे, हात फांद्यांसारखे आहेत तर पाय म्हणजे मुळे आहेत.
अशी कल्पना करा की तुम्ही पाय रोवून जमिनीवर उभे आहात. वारा वाहतोय, अंगाला खाज सुटली आहे, अंग दुखत आहे, असे वेगवेगळे अडथळे येत आहेत. आता कितीही अडथळे आले तरी मी हलणार नाही.
कोण
१३ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती हे करू शकते.
कुठे
घरामध्ये
कधी
ध्यान करायच्या आधी सात मिनिटे किंवा जास्त वेळ, दिवसाच्या कुठल्याही वेळेस.
वेळ
किमान ७ मिनिटे.
फायदे
सातत्याने काया स्थैर्याचा सराव केल्याने आपल्याला पुढील गोष्टी प्राप्त होतात :
ध्यानाची गुणवत्ता वाढवणे आणि ध्यानाच्या संपूर्ण कालावधीत शांतता व स्थिरता या भावना टिकवून ठेवणे.
शरीर, मन आणि बुद्धी यांच्यात एकतानता निर्माण करणे.
आपले सूक्ष्म शरीर मजबूत करणे.
सृजनशीलता सुधारण्यासाठी.
वैराग्य किंवा अलिप्तता वाढवणे.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...