प्रकाश
◘निर्मितीचा स्त्रोत प्रकाश आहे. प्रकाशाच्या मितीला परब्रम्हलोक असे म्हणतात.
◘प्रकाशापासून अब्जावधी आकाशगंगा, विविध पृथ्वी व अनेक प्रकारचे जीव विकसित झाले.
◘प्रकाश स्वतःबरोबर निःस्वार्थ प्रेम, सहानुभुती, शांती, आनंद, अद्वितीय बुद्धिमत्ता, पवित्र्य, शक्ती, प्राणशक्ती, अशा अनेक आंतरिक गोष्टी बरोबर घेऊन येतो.
◘प्रकाश सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञ आहे.
◘प्रकाश अपरिवर्तनीय व कालातीत आहे हे सत्य आहे.
◘आपण आत्मा म्हणून उतरण्यापूर्वी प्रकाशाच्या बरोबर होतो, म्हणून प्रकाश हे आपले उगमस्थान आहे.
◘या भौतिक क्षेत्रात दैवी प्रकाश दिसु शकत नाही कारण तो सतत सूक्ष्म असतो. तथापि, हा खोल ध्यानात जाणवतो आणि पाहिलाही जाऊ शकतो.
◘प्रकाश सर्वांना निरोगी बनवितो.
◘प्रकाश हाच ईश्वर आहे.
आत्मा
◘आत्मा हा परमात्म्याचा अमर्त्य भाग आहे.
◘प्रेम, शांती, पावित्र्य या सारखे प्रकाशाचे सगळे पैलू आत्म्यामध्ये असतात कारण आत्मा हा प्रकाशाच्या प्रदेशातून भूतलावर उतरलेला प्रकाशाचाच एक कण आहे.
◘सृष्टीचा अनुभव घेणं हे आत्म्याचं कार्य असतं.
◘आपल्या छातीच्या मध्यभागी आनंद कोषात आपला आत्मा स्थित असतो.
◘सृष्टी अनुभवण्यासाठी आत्म्याला शरीराची मदत लागते म्हणून शरीर हे आत्म्याचं वाहक असतं.
◘आत्मा चिरंतन असतो त्यामुळे शरीराचा नाश झाला तरीही आत्म्याचं अस्तित्व कायम रहातं.
◘आत्मा त्याच्या मूलस्रोताशी म्हणजेच प्रकाशाशी एकरुप झाला की त्याचा प्रवास कायमचा संपतो.
◘सद्सद्विवेकबुद्धी हा आत्म्याचा आवाज आहे.
◘आपण सगळे आत्मे आहोत.
गुरु
◘आत्मसाक्षात्कार झालेली मार्गदर्शक व्यक्ती म्हणजे गुरु, जी आपल्याला परत आपल्या मूळ स्वरूपाकडे म्हणजेच प्रकाशाकडे घेऊन जाते.
◘गुरुंना संपूर्ण सत्याचं ज्ञान असतं आणि ते अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करतात.
◘गुरू आपल्याला धर्माचं ज्ञान देऊन त्या मार्गाकडे नेतात.
◘गुरु आपल्याला साधनेच्या मार्गावर नेऊन आपण पूर्णपणे स्वावलंबी आणि सक्षम होईपर्यंत मदत करतात.
◘कुणावरही कुठलीही गोष्ट लादून नव्हे तर उदाहरण देऊन गुरु मार्गदर्शन करतात.
◘प्रेरणा, उत्तेजन आणि शक्ती यांचा अखंड स्रोत म्हणजे गुरु!
◘गुरु म्हणजे प्रकाशाकडे नेणारा सर्वात सोप्पा मार्ग !
◘ज्या वेळी साधक अध्यात्म मार्गावर चालण्यासाठी पूर्णपणे सक्षम होतो, तेव्हांच गुरु त्याच्या समोर प्रकट होतात.
◘गुरु म्हणजे प्रकाशाचं मूर्त स्वरुप !
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...