योग
◘योग म्हणजे एकता. हे स्वतःचे किंवा आत्म्याचे आणि ईश्वराचे एकत्रीकरण आहे.
◘योग म्हणजे जाणीवपूर्वक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणे, तरीसुद्धा जागरूकतेने प्रयत्न केल्याशिवाय योग होत नाही.
◘जेव्हा आपण आपल्या शरीराच्या सहाय्याने विविध आसने करतो आणि श्वासोश्वास नियंत्रित करतो तेव्हा तो हटयोग अगर क्रिया योग होतो.
◘जेव्हा आपण मनाच्या सहाय्याने एखाद्या मंत्राची पुनरावृत्ती करतो, तसेच ध्यानाद्वारे व इंद्रिय नियंत्रण करतो तेव्हा तो राजयोग होतो.
◘जेव्हा आपण आपल्या भावनांच्या द्वारे प्रयत्न करून प्रेम, भक्ती अगर काहीही विधी अगर पूजा करत असू तर त्याला भक्ती योग संबोधतात.
◘जेव्हा आपण एखाद्या कृती द्वारे निस्वार्थपणे व निरपेक्ष वृत्तीनी एखाद्याची सेवा करतो तेव्हा तो कर्मयोग घडतो.
◘जेव्हा आपण प्रयत्नपूर्वक बुद्धीच्याद्वारे भेदभाव न करता स्वतः च्या मनोवृत्तीचे अवलोकन करतो तेव्हा तो ज्ञानयोग होतो.
◘सर्व योग स्वत:ला किंवा आत्म्याला ईश्वराच्या साक्षात्काराचा अनुभव प्राप्त करून देतात.
◘आपापल्या प्रवृत्ती नुसार योगाच्या एका किंवा वरील सर्व प्रकारच्या अभ्यासाने आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेऊ शकतात.
◘योगमार्गामध्ये अहंकार अडथळा बनून येतो.
◘जो सर्वकाळ योगमार्गा मध्येच असतो तो योगी.
प्रेम
◘प्रेम हे दैवी प्रकाशाचे दिव्य स्पंदन आहे.
◘प्रेम हा आपला मूळ स्वभाव आहे.
◘प्रेम ही अतिशय तरल व सर्वात उच्चतम भावना आहे.
◘प्रत्येक जण प्रेमाचा भुकेला आहे.
◘जिथे प्रेम असेल तिथे टीकात्मक न्यायनिवाडा केला जात नाही.
◘प्रेमात क्षमा केली जाते, प्रेम एखाद्याला बरे करू शकते, प्रेम मार्गदर्शन सुद्धा करते, प्रेमामुळे व्यक्ती संपूर्ण पणे बदलू शकते.
◘प्रेम हे अमर्याद असते, त्याला ना कुठली सीमा आहे ना कुठले बंधन आहे.
शांतता
◘शांती हे संतुलित मनाचे द्योतक आहे.
◘शांतीमध्ये संपूर्ण समाधान आहे, यामध्ये काही मागणेच नसते.
◘शांती हा जीवनाचा पाया आहे.
◘मौनातून शांतता मिळते.
◘जेव्हा आपल्या अंतरंगात इतरांमध्ये किंवा निसर्गात सुसंवाद असतो, तेव्हा शांतीची उत्पत्ती होते.
◘व्यक्तिगत शांततेमुळे, कुटुंबात शांतता येते मग कुटुंबातील शांततेमुळे सर्व समाजात शांती नांदते व सर्व समाजात शांती आल्यामुळे सर्व जगात शांती नांदू लागते.
◘शांतीच्या स्पंदनांमध्ये पृथ्वीवरील हिंसाचार नष्ट करण्याची ताकद आहे.
जागरुकता
◘जागरूकता म्हणजे अंतरात्मा आणि बाह्य जग ह्यांना सावध आणि सतर्क राहून जाणून घेण्याची क्षमता.
◘वेगवेगळी सत्यं माहीत करून घेऊन ती नीट समजून घेण्याची आत्म्याची क्षमता म्हणजे जागरूकता.
◘जागरूकतेचे विभाजन चार निरनिराळ्या अवस्थांमध्ये करता येते त्या म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती व तुरिया. या चार अवस्था शरीर मन व आत्मा यांच्या सहभागावरुन ठरवता येतात.
◘जागृत' ही जाणिवेची अवस्था बाह्य जगाशी नित्य संपर्क साधतांना असते. यांत शरीर (पंचेंद्रिय) आणि मन दोन्ही सक्रिय असतात.
◘स्वप्न' या अवस्थेमध्ये झोपेमध्ये सुध्दा जागरूकता रहाते. यामध्ये व्यक्तीचे शरीर निष्क्रिय असते पण मन मात्र कार्यशील असते.
◘सुषुप्ती ही जागरुकतेमधील गाढ झोपेची स्थिती असते जेव्हा एकही विचार नसतो. यामध्ये शरीर व मन दोन्हीही निष्क्रीय असतात.
◘तुरिया या आत्मजागरुकतेच्या अवस्थेत आत्म्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते, या अवस्थेत शरीर व मन सक्रिय नसले तरी आत्मा जागृत अवस्थेत असतो.
◘तुरिया अवस्थेत सर्वात जास्त जागरूकता असते ज्यामध्ये वरील तिन्ही अवस्था समाविष्ट असतात.
◘अंतःप्रेरणा तुरिया अवस्थेत विकसित होते. या अवस्थेत आत्मा फक्त साक्षीभावाने अवलोकन करत असतो.
◘आत्मज्ञानी व्यक्ती सतत तुरिया अवस्थेत रहाणे पसंत करतो. त्यावेळी आधीच्या तिन्ही अवस्था मात्र पडद्याआड जातात.
◘आपली जागरूकतेची पातळी ही आपल्या अध्यात्मातील प्रगती दाखवण्याचे प्रमुख साधन आहे.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...