ओम
◘ओम हा आदिम वैश्विक ध्वनी आहे, जो विश्वाच्या प्रत्येक अणूमध्ये कंपन करतो.
◘ओम हा अस्तित्वाच्या तीन स्पंदनशील अवस्थांचे प्रतिनिधित्व करतो. निर्मिती-अकार, निर्वाह-उकार, विघटन-मकार.
◘ओम हा एकाक्षरी शब्द आहे, ज्याचा उच्चार अगदी निःशब्द होऊनही सहज केला जातो.
◘ओम या पवित्र ध्वनीचा पुनरावृत्तीने केलेला जप हा एखाद्याला सर्वोच्च ध्यानाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी उन्नत करू शकतो.
◘खोल शांततेत, ओम हा मनाच्या आतून ऐकू येतो.
ऊर्जा
◘ऊर्जा ही प्रकाशाची गतिमान अथवा स्पंदनात्मक अभिव्यक्ती आहे.
◘ऊर्जेमध्ये प्रेम, बुद्धिमत्ता आणि शुद्धता सुद्धा येते कारण तिचा स्त्रोत प्रकाशामधून येतो.
◘प्रतिध्वनीच्या घनतेप्रमाणे ऊर्जा ही स्थूल किंवा सूक्ष्म असू शकते. म्हणूनच कोणत्याही निर्मितीच्या अस्तित्वामध्ये एक सूक्ष्म ऊर्जाक्षेत्र असते जे अणूपासून ता-यांपर्यंत आकाशगंगांपर्यंत आणि सूक्ष्म जगापासून ते स्थूल जगापर्यंत वाहून नेते.
◘विविध प्रकारांनी ऊर्जेच्या निरनिराळ्या सततच्या संयोजनामुळे निर्मितीत वैविध्यता येते,ज्यालाच माया असे म्हटले जाते.
◘स्थूल ऊर्जा क्षेत्र हे भौतिक वास्तविकतेला अगर स्वरूपाला सदृश प्रकटीकरण देते तर सूक्ष्म ऊर्जा क्षेत्र हे स्वर्गीय वास्तवाचे द्योतक असते.
◘ऊर्जा ही ५ घटकांची आहे-ईथर, हवा, अग्नी, पाणी आणि जमीन. जेव्हा हे दैवी गुणोत्तराशी जोडले जातात तेव्हा जीवन तयार होते.
◘ऊर्जा ही जीवनाची आणि उदरनिर्वाहाची प्राथमिक स्त्रोत आहे.
◘आपण अन्न, पाणी, सूर्य (प्राण) आणि ब्रम्हांड यांच्याकडून आपल्या भौतिक आणि ऐहिक शरीरासाठी, उदरनिर्वाहासाठी ऊर्जा मिळवत असतो.
◘साधना जितकी खोल (प्रगल्भ) असेल तितका वैश्विक ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो, ज्यामुळे आपली शरीरप्रणाली शुद्ध होते आणि अध्यात्मिक प्रगती लवकर होते.
प्राण
◘ प्राण ही आपल्याला सूर्याकडून प्राप्त होणारी विशेष व सूक्ष्म ऊर्जा आहे.
◘ प्राण हे जीवन आणि आरोग्याचे लक्षण आहे.
◘शरीरातल्या सूक्ष्म वाहिन्या म्हणजेच नाडयांच्या जाळ्यामधून हा प्राण, प्राणमय कोषात शोषला जातो.
◘आपल्या शरीरात ७२००० ऊर्जावहन करणा-या नळ्या आहेत. हे प्राणिक ऊर्जेचे द्वार आहे.
◘ऊर्जा पातळी, जीवनशक्ती दीर्घायुष्य यांचा थेट संबंध श्वासोच्छवासाच्या पद्धतीशी आहे आणि म्हणूनच प्राणायाम ही एक महत्वाची अध्यात्मिक साधना आहे.
◘जर आपण आपल्या प्राणावर नियंत्रण ठेवू शकलो तर आपण आपले जीवन आणि जीवनात येणा-या परिस्थिती नियंत्रित करू शकतो.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...