ब्रम्ह ज्ञान
ब्रम्ह ज्ञान म्हणजे सृष्टीबद्दलची संपूर्ण माहिती, प्रकाशाची संपूर्ण माहिती, निर्मिती, ५तत्वे, ३गुण, आत्म्याविषयीचे ज्ञान १४लोक, ५कोश, ७चक्र, धर्माचा नियम, कर्माचा नियम, स्वेच्छा, मुक्ती इत्यादी सर्व हे या व्यापक श्रेणीत येतात. हे ज्ञान आपल्याला सकारात्मक जीवन जगायला स्पष्टता आणि उद्देश देते.
अव्यक्ताच्या क्षेत्रातून, प्रकाशाचा एक अमर्याद महासागर प्रगट झाला, जो पहिले व्यक्त स्वरूप होता. या प्रकाशातून चेतनेचा अनंत महासागर उदयास आला. चेतनेपासून ब्रम्हांडाचा उदय झाला. प्रकाश हाच ईश्वर आहे.
प्रकाशाच्या मितीला परब्रम्हलोक असे म्हणतात. परब्रम्हातून निर्माण झालेली चेतना बुडबुड्याप्रमाणे बाहेर पडते आणि विघटित होते चेतना नर व मादी शक्तींमध्ये स्वतःला विघटित करते. यातील नर शक्ती जशीच्या तशीच राहीली .स्त्री शक्तीने देवी लोकाचे रूप घेतले.
स्त्री व पुरुष शक्तींच्या संयोगाने शिवलोक, विष्णूलोक आणि ब्रम्हलोक ही तीन दिव्य विश्व निर्माण झाली. विनाश, पालन -पोषण आणि सृष्टीची निर्मिती दैवी व्यक्तींवर सोपवण्यात आली अनुक्रमे भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रम्हदेव.
प्रकाश हा सृष्टीचा स्त्रोत आहे. संपूर्ण सृष्टी पंचतत्वांपासून बनली आहे. जसे आकाश, वायू ,अग्नी,जल,आणि पृथ्वी. सृष्टी मध्ये गुणही तीन असतात.जसे सत्वगुण, राजस आणि तमस.
भगवान ब्रम्हदेवांनी ब्रम्हांड निर्माण केले, म्हणजे भौतिक जग ज्या मध्ये अनेक नक्षत्र, आकाश गंगा,तारे,ग्रह, विविध प्रकारचे जीव आणि सर्जनशीलतेच्या सर्व अभिव्यक्ती असलेले भौतिक विश्व निर्माण केले. या भौतिक जगात चौदा लोक असतात. पहिला लोक आध्यात्मिक दृष्ट्या सर्वात उन्नत असतो व चौदावा लोक सर्वात जास्त भौतिकवादी असतो.
आपण सगळे आत्मे आहोत. आपण परब्रम्ह लोकात होतो. जसे प्रकाशाच्या समुद्रामधील छोटे प्रकाश कण. जे देवांनी अनुभवले तेच आपणही अनुभवत होतो. आपण देवासारखे शुद्ध होतो आणि त्याचे सर्व गुण व क्षमताही आपल्यात होत्या. प्रेम व आनंद हा आपला मूळ स्वभाव होता.
आत्म्याला मिळालेल्या स्वेच्छा या देणगीमुळे त्याला निवडीचे स्वातंत्र्य आहे. देवाने जेव्हा दैवी विश्व आणि भौतिक विश्व निर्माण केले तेव्हा आपल्याला सृष्टीचा अनुभव घेण्याची इच्छा झाली. देवाने आपल्याला सावधानतेचा इशारा दिला की आपण मर्यादेच्या पलिकडे अनुभवल्यास आपण तिथेच अडकून राहू शकतो. पण तो आपल्या स्वातंत्र्याच्या विरोधात आला नाही.
आत्म्याला मिळालेल्या स्वेच्छा या देणगीमुळे त्याला निवडीचे स्वातंत्र्य आहे. देवाने जेव्हा दैवी विश्व आणि भौतिक विश्व निर्माण केले तेव्हा आपल्याला सृष्टीचा अनुभव घेण्याची इच्छा झाली. देवाने आपल्याला सावधानतेचा इशारा दिला की आपण मर्यादेच्या पलिकडे अनुभवल्यास आपण तिथेच अडकून राहू शकतो. पण तो आपल्या स्वातंत्र्याच्या विरोधात आला नाही.
पंचकोष
दैवी लोकातून प्रवास करताना आपल्याला विशेष आवरण दिले गेले त्याला आपण कोश असे म्हणतो.
या पृथ्वीतलावर आल्यावर आपल्याला हे भौतिक शरीर मिळाले आहे.
याचे पाच कोश आहेत, अन्नमयकोश-शरीर, प्राणमयकोश-जीवन शरीर, मनोमयकोश-मानसिक शरीर, विज्ञानमयकोश-बौध्दिक शरीर आणि आनंदमय कोश-अध्यात्मिक शरीर.
जेव्हा आत्मे ब्रम्हांडातून उतरले तेव्हा सत्य लोक, तपोलोक, जनलोक, महरलोक, सुवरलोक आणि भुवरलोक या मार्गाने प्रवास करून सातव्या लोकांत , पृथ्वीवर किंवा भूलोकात पोहोचले.
या प्रवासाच्या दरम्यान आपल्या मनोमय कोशावर प्रत्येक लोकांमध्ये शक्तिशाली उपकरणे बसवण्यात आली ज्याला चक्र असं म्हणतात. म्हणूनच आपल्याकडे सात लोकांची विशिष्ट ऊर्जा व ज्ञान दर्शवणारी प्रत्येक लोकांची सात चक्रे आहेत. चक्र सक्रिय झाल्यावर संबंधित स्तरांच्या ज्ञान व ऊर्जेचे प्रवेशद्वार बनतात. ही ऊर्जा चक्रांमध्ये साठवता येते.
सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र,स्वाधिष्ठान चक्र,मुलाधार चक्र अशी सात चक्रे आहेत.प्रत्येक चक्र हे वेगवेगळ्या उच्च लोकांमध्ये आत्म्याच्या आरोहणासाठी किंवा निर्गमनासाठी प्रवेश बिंदू आहे.
सप्तऋषींची भूमिका
एकावरएक असलेल्या पंचकोशांमध्ये आत्मा,कोशांच्या मर्यादांमुळे त्याची दृष्टी ढगाळ होते व तो आपले मूळ स्वरूप विसरतो. यामुळे अज्ञान व अहंकार निर्माण होतो.
आत्म्याने अधिकाधिक अनुभव घेतल्यामुळे तो मायेच्या जाळ्यात अडकतो, तो इंद्रियांच्या आहारी जाऊन दैवी नियमांचे उल्लंघन करतो. प्रेम,आनंद, शांती ,एकोपा हे आपले स्वरूप तो विसरतो.
अनुभवाच्या अतिरेकाने आत्मा कर्म संचय करतो. आत्म्याकडे सुरुवातीला असलेल्या क्षमता गमावल्या आणि म्हणून देव व दिव्यत्वा पासून तो विभक्त होतो.आता या कर्मांचा संचय शुद्ध करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात पण तरीही तो इथेच अडकतो.
सर्व आत्म्यांचे मार्गदर्शन करणे ही सप्तऋर्षींची जबाबदारी व विशेष भूमिका आहे. आत्म्याने एकदा किंवा दोनदा सृष्टीचा अनुभव घेतल्यानंतर,आत्म्यांची परतीची वेळ आली आहे ,याची आठवण करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
आत्मा मायेत अडकल्यामुळे, कर्माचा जो संचय झाला आहे, तो साफ करण्यासाठी ध्यान व सकारात्मकता ही विशेष सत्रे सप्तऋषींनी तयार केली, नंतर ही तंत्रे मानवी माध्यमातून, जे गुरु स्वरूप होते ती शिकवली.
आत्म्याच्या पूर्ण प्रवासानंतर जेव्हा त्याला शेवटी स्वातंत्र्य मिळते तेव्हा त्याला मुक्ती किंवा पूर्ण स्वातंत्र्य असे म्हणतात.
गुरु हे अध्यात्मिक मार्गदर्शक असतात. गुरु आपल्याला मार्गदर्शन करून कर्मबंधनातून व जीवन-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्याची पूर्ण जबाबदारी घेतात. ते आपला अध्यात्मिक मार्ग सुरू करून देतात. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय ते शिकवतात व सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम, शांती, आनंद व सकारात्मकतेने, अध्यात्मिक व भौतिक जीवन संतुलित करून जगण्यास मदत करतात.
गुरु हे अध्यात्मिक मार्गदर्शक असतात. गुरु आपल्याला मार्गदर्शन करून कर्मबंधनातून व जीवन-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्याची पूर्ण जबाबदारी घेतात. ते आपला अध्यात्मिक मार्ग सुरू करून देतात. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय ते शिकवतात व सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम, शांती, आनंद व सकारात्मकतेने, अध्यात्मिक व भौतिक जीवन संतुलित करून जगण्यास मदत करतात.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...