प्रणव साधना-ध्यानसत्र फक्त लहान मुलांसाठी
ब्रम्हर्षी हर्मिटेजतर्फे ७ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी "प्रणव साधना" ध्यानसत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही ऑनलाइन सत्रे तीन दिवस- सोमवार, बुधवार आणि शुक्रवार- दररोज २० मिनिटांसाठी, सायंकाळी ५:३० ते ६.०० या वेळेत (IST) घेतली जाणार आहेत.
ही मार्गदर्शित साधना मुलांची एकाग्रता वाढविण्यास, भावनिक समतोल विकसित करण्यास आणि अंतर्गत शांतता व सकारात्मकता जोपासण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. तसेच, साध्या पण प्रभावी ध्यानतंत्राच्या माध्यमातून लहान वयातच त्यांना आध्यात्मिक जागरुकतेची ओळख करून देते.
आपल्या मुलांच्या अंतर्गत विकासासाठी आणि एकुणच सर्वांगीण कल्याणासाठी हा वेळ समर्पित करण्यास आम्ही आपल्याला प्रोत्साहित करतो, त्यांना शांत आणि एकाग्र मनाची अनमोल भेट द्या.
आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आजच नोंदणी करा.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...