महर्षी पतंजली | अष्टांग योग | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

महर्षी पतंजली


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

महर्षी पतंजली हे २ ऱ्या शतकातील महान ऋषी. आदिशेष या नागदेवतेने महर्षी पतंजलींच्या रुपात जन्म घेतला.

योगसूत्र' नावाचा ग्रंथ लिहून जे अजरामर योगदान त्यांनी मानवजातीला दिलं, त्यामुळे महर्षी पतंजलींना योगाचे आद्य जनक म्हणून सन्मान मिळाला. योग आणि ध्यान यांचं ज्ञान योग सूत्रांच्या स्वरूपात सर्व प्रथम त्यांनी आणलं जे आजतागायत, योग संदर्भातील शास्त्रशुद्ध लिखित साहित्य म्हणून प्रमाण मानलं जातं. सगळ्यात जास्त वेळा भाषांतर झालेलं हे प्राचीन संस्कृत साहित्य आहे. त्यांनी शुद्ध आणि नेमक्या स्वरूपात योग शास्त्राची मांडणी केली. त्यांनी व्याकरण आणि वैद्यक शास्त्रावरही प्रबंध लिहिला.

महर्षी पतंजली हे १८ सिध्दांपैकी एक आहेत. सिद्ध थिरुमूलर यांच्या थिरुमंधिरम नावाच्या उत्कृष्ट ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, महासिद्ध नंधिकेश्वरार यांच्याकडे महर्षी पतंजलींनी योगाचं अध्ययन केलं.

गेल्या दशकात इंटरनेटवर सगळ्यात जास्त शोधलं गेलेलं साहित्य जर कुठलं असेल तर ते म्हणजे योग आणि त्यासाठी परदेशी प्रवाशांकडून प्राधान्याने निवडलं जाणारं आध्यात्मिक ठिकाण म्हणजे भारत. या प्रवाश्यांना योगाकडे आकर्षित करण्यामागे आहे यात असलेलं शास्त्र आणि स्पष्टता.

आजच्या आधुनिक काळातल्या कुठल्याही शारीरिक आणि मानसिक आजारावर योगाद्वारे उपचार होऊ शकतो. मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेली सगळ्या परिमाणांनी योग परिपूर्ण आहे. त्याचा आवाका शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यापुरता मर्यादित नाही. अश्या या योगशास्त्राच्या साराचं पूर्णत्व आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून अनुभवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हीच आदरणीय महर्षी पतंजलींना सुयोग्य मानवंदना ठरेल.

आजच्या आधुनिक काळातल्या कुठल्याही शारीरिक आणि मानसिक आजारावर योगाद्वारे उपचार होऊ शकतो. मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेली सगळ्या परिमाणांनी योग परिपूर्ण आहे. त्याचा आवाका शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यापुरता मर्यादित नाही. अश्या या योगशास्त्राच्या साराचं पूर्णत्व आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून अनुभवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हीच आदरणीय महर्षी पतंजलींना सुयोग्य मानवंदना ठरेल.

अष्टांग योग


पतंजलींनी योग सूत्रांची विभागणी संस्कृतमध्ये ४ भागांत किंवा पदात केली. समाधी पद, साधना पद, विभूती पद, कैवल्य पद.

आत्मसाक्षात्काराप्रत क्रमाक्रमाने पोचवणारा, आठ पदरी मार्ग म्हणून, अष्टांगयोग समाधी पदामध्ये विशद केला आहे. त्याचे आठ भाग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धर्म, ध्यान, समाधी.


अष्टांगयोगचे आठ भाग आहेत

वाचण्यासाठी प्रत्येक लिंक वर क्लिक करा

यम म्हणजे स्वसंयमासाठी असलेले नियम, जे रोजच्या जगण्यात इतरांशी संवाद साधतांना अंगिकारायचे असतात. ही खरंतर वैश्विक मार्गदर्शक तत्वं आहेत. यांना स्थळ, काळ आणि परिस्थितीची सीमा नाही. इथे पुन्हां ५ विहित (ठरलेले) नियम आहेत.

अहिंसा
कोणत्याही प्रकारच्या, म्हणजेच वैचारिक, शाब्दिक किंवा प्रत्यक्ष हिंसेचा संपूर्ण अभाव म्हणजे अहिंसा. यात स्वतःच्या बाबतीत कठोर न होणेही अंतर्भूत आहे.

सत्य
सदैव, कुठल्याही परिस्थितीत आपला खरेपणा टिकवून ठेवणं, कुठल्या प्रकारच्या खोटेपणाला थारा न देणं म्हणजे संपूर्ण सत्य.

आस्तेय
वस्तु, नाती, ज्ञान, कल्पना इत्यादीं पैकी कुठल्याही प्रकारची चोरी न करणं म्हणजे आस्तेय.

ब्रह्मचर्य
सदोदित परमात्म्याशी एकतानता साधणं, लैंगिक संयम पाळणं म्हणजे ब्रह्मचर्य.

अपरिग्रह
मालकी हक्काची भावना, वस्तूंचा संचय करण्याची वृत्ती, लोभीपणा या सर्वांपासून दूर राहणे म्हणजे अपरिग्रह.

नियम हे व्यक्तिगत पातळीवर पाळायचे असतात. याचे ५ प्रकार आहेत.

शौच
यात व्यक्तीची अंतर्बाह्य शुद्धी अभिप्रेत आहे. बाह्य शुद्धीत आपल्या शरीराची आणि भोवतालच्या परिसराची स्वच्छता येते. तर आपले विचार आणि भावना शुद्ध ठेवणं म्हणजे अंतर्शुद्धी.

संतोष
तृप्ती आणि शांत मन यामुळे जे समाधान मिळतं ते म्हणजे संतोष.

तपस्
अत्यंत खडतर ध्यानसाधना म्हणजे तपस्. हे बाह्य आणि अंतर्गत अश्या दोन्ही प्रकारचं असू शकतं. पंचेंद्रियं बाह्य निर्बंधांद्वारे ताब्यात ठेवणं हे बाह्य तपस् झालं तर, चिकाटीने कितीही गोंधळात शांत रहाणं, त्यागवृत्ती अंगी बाणवणं हे अंतर्गत तपस् ! शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती एकमेकांना साह्यभूत होतात.

स्वाध्याय
आपलं आपण केलेलं अध्ययन म्हणजे स्वाध्याय. आणि हे अध्ययन फक्त पवित्र साहित्यापुरतंच मर्यादित नाही, तर आपली वागणूक, आपल्या सुप्त मनांत येणाऱ्या बऱ्या वाईट विचार आणि विकारांकडे बारीक नजरेने बघणं ही स्वाध्यायात समाविष्ट आहे.

ईश्वर प्रणिधान
ईश्वर, ऋषी किंवा आपल्या गुरूंना संपूर्ण शरण जाणं, आपलं कर्मफल आशिर्वाद म्हणून स्वीकारणं म्हणजे ईश्वर प्रणिधान.

प्राणायाम आणि ध्यानासाठी भक्कम आणि सुखदायक आसन अत्यावश्यक आहे

ठाम ध्यानस्थितीत आसनस्थ झाल्याशिवाय, शरीर अचल राहू शकणार नाही आणि शरीर अचल नसेल तर एकाग्रता आणि मनोनिग्रह साधणार नाही.

योगासन हे जागरुकता आणि पद्धतशीर श्वासोच्छवासासह शारीरिक व्यायाम आहेत. ते शरीर मजबूत आणि लवचिक ठेवतात.

प्राण म्हणजे सूक्ष्म वैश्विक ऊर्जा जिने संपूर्ण जगत् व्यापलेलं आहे. श्वास घेतांना आपल्याला आपल्या सूर्याकडून, हा प्राण मिळतो. श्वास ही आपल्या जिवंतपणाची खूण आहे. प्राणायाम हा आपला श्वास नियमित करण्यासाठी असलेला सराव आहे.

प्राणायाम करतांना सूक्ष्म ऊर्जा आपल्या सगळा कोषांत शिरून आपली शरीर प्रणाली शुद्ध करते.

प्राणायाम, जो अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला मदत करतो त्यात पूरक, रेचक आणि कुंभकाचा समावेश असतो. कुंभक स्थितीत, छाती चुंबकीय क्षेत्रासारखं काम करते. पवन चक्कीतून ज्याप्रकारे वीज निर्माण केली जाते त्याचप्रमाणे, श्वासाद्वारे छातीत भरून घेतलेल्या प्राणशक्तीला प्रचंड गती देऊन ती आपल्या फुफ्फुसांत पाठवली जाते. आपली फुफ्फुसं एखाद्या जनित्र/जनरेटर सारखं काम करून या प्राणशक्तीतून ऊर्जा निर्माण करतात. ही ऊर्जा आपल्या चक्रांमध्ये साठवली जाते. चक्रं एखाद्या ट्रान्सफॉर्मर प्रमाणे साठवलेली ऊर्जा संपूर्ण शरीरात वितरित करतात. ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला निरोगी दीर्घायुष्य प्रदान करते.

आसनं जड देहासाठी तर प्राणायाम सूक्ष्म देहासाठी ! प्राणायामाचा नियमित सराव आपल्या सगळ्या नाड्या आणि पंचकोष शुद्ध आणि सक्षम करतो. मन शांत करून ध्यान करतांना येणाऱ्या विचारांचा वेग कमी करतो.

भौतिक गोष्टींतून मन आणि पंचेंद्रियं काढून घेऊन अलिप्त होणं म्हणजे प्रत्याहार ! भौतिक जगाला आपल्या पंचेंद्रियांद्वारे प्रतिसाद देणं जाणीवपूर्वक थांबवणं म्हणजे प्रत्याहार. बाहेरच्या जगाला आपला ताबा घेऊ न देणं प्रत्याहारामुळे शक्य होतं.

प्रत्याहाराचा उगम बुद्धीत होतो.

धारणा म्हणजे मन एकाच बाह्य किंवा आंतरिक गोष्टीवर/आकारावर अथवा कल्पनेवर केंद्रित करणं. धारणेमुळे मन आपोआप स्थिर होतं.

श्वासाकडे लक्ष देणं, मंत्रजप करणं, एखादी प्रतिमा किंवा वस्तू किंवा प्रकाशाची कल्पना मिटलेल्या डोळ्यांनी करणं इत्यादि प्रकारच्या धारणा असतात.

शरीर, मन आणि बुद्धी यांना स्थिर आणि शांत करणारी प्रक्रिया म्हणजे ध्यान. प्रभावी शारीरिक स्थिरता, एकाग्रता आणि कल्पनाशक्ती यांच्या उत्तम मिलाफातून साधणारे फलित म्हणजे ध्यान.

आपण जसजशी ध्यानात प्रगती करतो तसं आपलं मन स्थिर होतं, जाणिवेचा कक्षा रुंदावतात आणि आपल्याला प्रकाशाचा अनुभव येऊ लागतो.

प्रभावी ध्यानाची निष्पत्ती म्हणजे समाधी

हे आहे संपूर्ण अद्वैत ! ही अशी विचारहीन अवस्था आहे, ज्यात साधक आणि ध्यान यांच्यातील द्वैत संपते.

समाधीमध्ये आपण शरीर, काळ आणि अवकाश याच्या पलीकडे जातो आणि स्वतः प्रकाश बनतो.