धर्म

◘धर्म आपल्या मूळ स्वभावात अंतर्भूत असलेल्या ख-या प्रेमाला आणि पवित्रतेला धरून रहातो.
◘धर्म नेहमी प्रकाशाची बाजू निवडतो आणि त्याची कास धरतो.
◘धर्म हा निर्भय असतो.
◘धर्म आपल्या सदसद्विवेक बुद्धीचा कायम पाठपुरावा करीत असतो.
◘आपल्या विवेक बुद्धीच्या विरोधात जे काही कर्म केले जाते त्याला अधर्म म्हणतात.
◘आपल्या आंतरिक मनातील धर्म आणि अधर्म यांतील द्वंद्वांला धर्माची लढाई म्हणतात.
◘धर्म आणि अधर्म यांचा जो खेळ आहे तो मायेचा एक भाग आहे.
◘हा एक वैश्विक नियम आहे की अधर्मावर नेहमीच धर्माचा विजय होतो.
◘जर आपण धर्माचे समर्थन केले तर धर्म पण आपली बाजू उचलून धरतो.
◘धर्म कधीच अपयशी ठरत नाही.
अध्यात्म

◘अध्यात्म हे आत्म्याचे विज्ञान आहे.
◘अध्यात्म धर्माचरण शिकवते.
◘अध्यात्म धर्माचे पालन करण्याचे शहाणपण व शक्ती देते.
◘अध्यात्म म्हणजे संवेदनांच्या पार जाऊन आपल्या आत्म्याचा अनुभव घेणे.
◘अध्यात्म आत्मसाक्षात्कार व त्या पुढील प्रगतीसाठी मार्गदर्शक आहे.
◘आत खोल जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न हा अध्यात्माचा पाया आहे.
◘ऋषी आपल्याला अध्यात्माचे ज्ञान देतात.
◘अध्यात्म वेगवेगळ्या पंथाचे सार आहे,म्हणून ते वैश्विक आहे.
◘अध्यात्मिक व्यक्तींची आयुष्याकडे व परिस्थितीकडे बघण्याची वृत्ती नेहमी सकारात्मक असते.
साधना

◘आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी स्वतःला लावलेली स्वयंशिस्त म्हणजे साधना.
◘साधना म्हणजे सतत व सातत्याने केलेली कृती.
◘आत्म् साक्षात्कार हे अध्यात्मिक साधनेत पहिले ध्येय असते.
◘साधनेमुळे आपण आपले व देवामधील अंतर कमी करत असतो.
◘साधनेमध्ये गुरु आज्ञा शिरसावंद्य असते.
◘साधना म्हणजे आत्म्याची साद असते जी कोणत्याही वयात सुरू करता येते.
◘साधनेमध्ये दृढ विश्वास, संयम व स्वीकृती गरजेची असते.
◘साधनेमुळे भौतिक व अध्यात्मिक आयुष्य संतुलितपणे जगण्याची परिपक्वता येते.
दिक्षा

◘दिक्षा ही गुरुपासून साधकाकडे अध्यात्मिक शक्ती संक्रमित करण्याची एक प्रक्रिया आहे.
◘दिक्षा घेताना, जिवात्मा थेट त्याच्या स्त्रोत म्हणजे मूळ दिव्य प्रकाशाशी, तेजाशी जोडला जातो.
◘गुरुंच्या कृपाशिर्वादानेच दिक्षा होते.
◘दिक्षेनंतर साधना करताना शरीराची संपूर्ण शुद्धी होते व साधनेत अधिक ऊर्जा स्वीकारण्यास शरीराला मदत होते.
◘दिक्षा ही साधनेची आणि गुरुप्रती वचनबद्धतेची सुरुवात असते.
◘दिक्षेनंतर साधनेत सतत उत्तरोत्तर प्रगती होत असते.
◘प्रत्येक दिक्षा हि अध्यात्मिक प्रगती दर्शवणारा मैलाचा दगड असतो.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...