माया | गुण | एकरूपता | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

माया


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

संपूर्ण चराचरामध्ये माया सर्वव्यापी आहे.

आत्मा जेव्हां मनाचा हत्यार म्हणून वापर करून, मायेच्या माध्यमातून पलिकडे पहातो, तेव्हांच जग प्रक्षेपित होऊन त्याला दिसतं. जसा एखादा चित्रपट प्रक्षेपका द्वारे पडद्यावर प्रक्षेपित केला जातो त्याचप्रमाणे मनाचा वापर करून जग प्रक्षेपित केले जाते.

ही माया पडदा होऊन, प्रकाशाचं मूलभूत सत्य आत्म्यापासून लपवते.

सृष्टीमध्ये विविधता निर्माण करणं हेच मायेचं उद्दिष्ट आहे त्यामुळे माया नसेल तर वैविध्य नसेल, फक्त प्रकाश असेल.

माया किंवा जग म्हणजे कालबद्ध असं ज्ञात सत्य आहे, तर प्रकाश हे निखळ, कालातीत सत्य आहे.

निर्मिती, पोषण आणि संहाराच्या दरम्यान मायेत परिवर्तन होत रहातं तर प्रकाश हे शाश्वत असं अपरिवर्तनीय सत्य आहे.

आत्मसाक्षात्कार होण्याआधी आपल्याला फक्त माया दिसते आणि प्रकाश असत्य वाटतो. पण साक्षात्कारानंतर प्रकाशाचं दर्शन होताक्षणी, मायेचं फोलपण जाणवतं. म्हणूनच साक्षात्कारी लोक मायेला भ्रम असं म्हणतात.

गुण


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

मायेची' तीन वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी रुपं म्हणजे त्रिगुण. त्यांना सत्व, रजस् आणि तमस् असे संबोधतात.

प्रत्येक व्यक्ती आणि या सृष्टीमधल्या प्रत्येक निर्मिती मध्ये हे तीनही गुण वेगवेगळ्या स्वरूपात तसेच वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र आलेले पहायला मिळतात.

जसे मूळ रंग असलेल्या लाल, हिरव्या आणि निळ्या रंगांचे वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रण केल्यास नवनवीन रंग तयार होतात, तसे कमी अधिक प्रमाणात एकत्र आलेल्या या तीनही गुणांमुळे मनुष्य स्वभावात विविधता पहायला मिळते.

सत्त्व हा गुण विद्वत्ता, संतुलन, समन्वय, पवित्रता, सकारात्मकता, शांतता आणि मूल्य जपणूक ही वैशिष्ट्ये दर्शवतो.

रजस किंवा रज हा गुण आवड, क्रियाशीलता, स्वमग्नता ही वैशिष्ट्ये दर्शवतो.

तमस् किंवा तमोगुण हा असंतुलन, अव्यवस्थितपणा, चिंता, जडता, आळशीपणा, हिंसा, चालढकल आणि उदासीनता ही वैशिष्ट्ये दर्शवितो.

एखाद्या व्यक्तीचा किंवा पदार्थाचा स्वभाव हा ह्या तीन गुणांच्या एकत्रित परिणामांचा परिपाक होय. म्हणूनच आपल्या आचरणावर आणि तद्नुरूप जीवनात घडणाऱ्या घटनांवर या त्रिगुणांमुळे खूप प्रभाव पडतो.

प्रकाश हा मायेच्या प्रभावाखाली येत नसल्यामुळे त्याला निर्गुण म्हणजेच गुणरहित म्हणतात.

एकरूपता


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींमधील दुवा म्हणजे एकरूपता. प्रत्येकाच्या आत्म्याशी व हृदयाशी जोडला जाणारा दुवा म्हणजे एकरूपता.

विश्वाच्या प्रत्येक घटने मध्ये, निर्मिती मध्ये हा एकरूपतेचा प्रकाश पाहता येतो.

चल-अचल गोष्टी एकाच प्रकाशातून, एकरूपतेतून आलेल्या आहेत.

एकरूपतेत आपण मायेपलीकडे जातो.

एकरूपता विविधतेत एकता आणते.

हि एकरूपता आपल्या सर्व शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरांवर समन्वय साधते. या एकात्मतेमुळे योग साधला जातो.