संघटना
ब्रम्हर्षिज हर्मिटेज (Brahmarishis Hermitage) ही एक ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी अध्यात्मिक संस्था आहे.
साधनेतून आत्मसाक्षात्कार' आणि 'मानवतेची सेवा' ही आपल्या मार्गाची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. सर्व प्रामाणिक अध्यात्मिक इच्छुकांना ध्यान शिकवणे व ऋषी आणि सिद्धांनी शिकवल्याप्रमाणे अध्यात्मिक ज्ञान देणे हा या मार्गाचा उद्देश आहे.
दैवी प्रेम आणि एकात्मता यांच्या बरोबरीने या मार्गाचा अंतिम हेतु हा मानवतेला सत्ययुग व शंबला सारख्या नवीन युगातील वास्तवात नेणे हा आहे.
सप्तॠषी आणि १८ सिद्ध हे आपले प्रकाशाचे मार्गदर्शक आहेत.
सप्तॠषी आणि सिद्धांच्या दैवी आवाहनाला प्रतिसाद म्हणून, आपले गुरू श्री देवात्मानंद शंबला यांनी २०१४ मध्ये ब्रम्हर्षि हर्मिटेजची स्थापना केली. श्री देवात्मानंद शंबला हे साधकांची अध्यात्मिक वाढ आणि आंतरिक परिवर्तन सोपे करण्यासाठी अध्यात्मिक तंत्राची सुरूवात व मार्गदर्शन करतात.
प्राणायाम, ध्यान, प्रगत ध्यान पद्धती, क्रिया, योगासने, सकारात्मकतेच्या पद्धती आणि अध्यात्मिक तंत्रे यांसारख्या अध्यात्मिक पद्धती साधकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शिकवल्या जातात. साप्ताहिक सत्संग ऑनलाइन समूहध्यान आणि त्यानंतर सविस्तर प्रश्नोत्तरे नियतकालिके, अध्यात्मिक शिबिरे घेतली जातात आणि ज्या तीर्थक्षेत्रांवर जास्त उर्जा आहेत अशा यात्रा देखिल केल्या जातात. स्वतःला आणि इतरांना बरे करण्याचे तंत्र शिकवले जातात.
प्राणायाम, ध्यान, प्रगत ध्यान पद्धती, क्रिया, योगासने, सकारात्मकतेच्या पद्धती आणि अध्यात्मिक तंत्रे यांसारख्या अध्यात्मिक पद्धती साधकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शिकवल्या जातात. साप्ताहिक सत्संग ऑनलाइन समूहध्यान आणि त्यानंतर सविस्तर प्रश्नोत्तरे नियतकालिके, अध्यात्मिक शिबिरे घेतली जातात आणि ज्या तीर्थक्षेत्रांवर जास्त उर्जा आहेत अशा यात्रा देखिल केल्या जातात. स्वतःला आणि इतरांना बरे करण्याचे तंत्र शिकवले जातात. आपल्या अध्यात्मिक प्रवासाचा शोध घेण्याची आणि आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने या आधुनिक जगात स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने कार्य करणा-या सर्वांसाठी या मार्गाचे दरवाजे सदैव उघडे आहेत.
कार्य
देवात्मानंद शंबला अध्यात्मिक वाढ आणि आंतरिक परिवर्तन सुलभ करण्यासाठी साधकांना अध्यात्मिक तंत्रांमध्ये आरंभ करून मार्गदर्शन करतात.
प्राणायाम, ध्यान, प्रगत ध्यान पद्धती, क्रिया, योगासने, सकारात्मकतेच्या पद्धती आणि अध्यात्मिक तंत्रे यांसारख्या अध्यात्मिक पद्धती साधकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शिकवल्या जातात. साप्ताहिक सत्संग ऑनलाइन समूहध्यान आणि त्यानंतर सविस्तर प्रश्नोत्तरे नियतकालिके, अध्यात्मिक शिबिरे घेतली जातात आणि ज्या तीर्थक्षेत्रांवर जास्त उर्जा आहेत अशा यात्रा देखिल केल्या जातात. स्वतःला आणि इतरांना बरे करण्याचे तंत्र शिकवले जातात.
सध्या, आमचे गुरू देवात्मानंद शंबला हे जगाच्या विविध भागातील ध्यान करण्या-यांना मार्गदर्शन करत आहेत. "स्पिरीट्युअल विजडम" नावाचे द्वैमासिक वृत्तपत्र सुद्धा साधकांच्या फायद्यासाठी या संघाद्वारे प्रकाशित केले जाते. वृत्तपत्र हे एक सखोल प्रकाशन आहे ज्यात आपल्या गुरूंच्या भाषणाचा गाभा आहे आणि ऋषीमुनींनी दिलेले दुर्मिळ ज्ञान आहे.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...