सत् -ज्ञान योग साधना
ब्रह्मऋर्षिज हर्मिटेज या संस्थेने नुकताच "सत्-ज्ञान योग साधना" या नावाने एक कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, विशेष प्रकारची योगासने, प्राणायाम आणि ध्यान हे शिकवले जाते. हा कार्यक्रम केवळ कामाच्या ठिकाणी आणि संस्थांमध्ये आयोजित केला जातो. या उपक्रमाद्वारे आम्ही लोकांना अशी मदत करतो जेणेकरून लोकांची जास्तीत जास्त उत्पादकता वाढेल, त्यांची सर्जनशीलता वाढेल, शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल व संघ गतिशील होईल. सत्-ज्ञान योग साधना ही साधना पद्धती तुमच्या कामाच्या ठिकाणी शिकवायची असल्यास कृपया आमच्या कार्यालयाच्या मदत कक्षाशी व्हाट्सअप किंवा ई-मेल द्वारा खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा. ई-मेलसाठी-@brahmarishishermitage.org
अद्ययावत
-
जून 21, 2024
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमच्या स्वयंसेवकांनी सत्-योग साधना शिबिर, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगलोर येथील प्रांगणात मध्ये घेतले. या मध्ये १३० विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. गुरुदेव देवात्मानंद शंबला तिथे उपस्थित होते. त्यांनीही सहभागी असलेल्यांना ध्यान शिकवले आणि अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
-
जून 10 - 14, 2024
ब्रम्हऋर्षिज हर्मिटेज या संस्थेतर्फे URSC, ISRO, बंगलोरच्या ISITE या संस्थेच्या प्रांगणात मध्ये "सत्- ज्ञान योग साधना" याचे शिबिर घेण्यात आले.
-
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...