मन
◘मन हे जैविक उत्क्रांतीत सर्वोच्च असे सहावे इंद्रिय आहे. हे आपल्याला मानवी अनुभवांपैकी सर्वोच्च अनुभव घेण्यास मदत करते.
◘मायेच्या सहाय्याने निर्मितीचा अनुभव घेणे हे मनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
◘मन हे ५ ज्ञानेंद्रियांशी संवाद साधते - कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक अनुक्रमे आवाज, स्पर्श, दृष्टी, चव आणि गंध अनुभवण्यास मदत करते.
◘मन आणि शरीर एकत्र मिळून काम करतात व या इंद्रियांसाठी मेंदूचा केंद्रबिंदू म्हणून वापर करतात.
◘मनात भावनांचा वास असतो. तसेच आठवणी व कर्मांचा साठा येथे केला जातो.
◘मन हे संपूर्ण मानवी प्रणालीत पसरलेले आहे. तसेच संकल्प करून संपूर्ण ब्रम्हांडात पसरण्याची आणि व्यापण्याची क्षमता देखील मनात असते.
◘मनाची कार्यप्रणाली सर्वात सूक्ष्म आणि गुंतागुंतीची मानली जाते.
◘मनाच्या इतर कार्यांमध्ये अनुभव घेणे, कल्पना करणे, निर्मिती करणे, समजणे, लक्षात ठेवणे व पुनर्प्राप्ती करणे इत्यादी आहे.
◘जास्त कर्मांच्या ठशांमुळे मन क्षीण होते आणि आत्म्याची पुढील प्रगती थांबते.
◘जीवाची शुद्धता मुख्यत्वे मनाच्या शुद्धतेवर अवलंबून असते, म्हणून मनाला मानसिक अशुध्दी किंवा षडरिपूंपासून मुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
◘अशा अशुद्धतेपासून मन शुद्ध करण्यामध्ये साधनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
अहंकार
◘अहंकार ही आत्म्याचीच चुकीची आर्वृत्ती आहे.
◘अहंकारामुळे आपण स्वतःला शरीर अगर मन असे ओळखतो.
◘आत्म्याने जेव्हा शरीरात प्रवेश केला तेव्हा अहंकाराचा जन्म झाला व अहंकारामुळे आपण स्वतःला शरीरच समजु लागलो व आपली खरी ओळख विसरलो.
◘मन व मायेमुळे अहंकार निर्माण होतो.
◘अहंकार आत्म्याच्या प्रज्ञेस झाकोळून टाकतो.
◘अहंकारामुळे आपल्यावर मर्यादा येतात व अहंकार दिशाभूल करतो.
◘अहंकारामुळेच आपल्याला दुःख व यातना भोगाव्या लागतात.
◘अहंकार साधनेच्या मध्ये येतो आणि आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया त्यामुळे लांबते.
◘अहंकार हा फक्त प्रेमामुळे नाहीसा होतो.
कर्म
◘कर्म म्हणजे कृतीचा परिणाम.
◘केलेल्या कृतीच्या हेतुवर आधारित त्याच्या चांगल्या किंवा वाईट परिणामांचा ठसा उमटतो आणि त्यालाच चांगले किंवा वाईट कर्म म्हणतात.
◘चांगले कर्म आनंद आणतात तर वाईट कर्म दुःख आणतात.
◘हे ठसे सारख्याच म्हणजे चांगल्या किंवा वाईट ठशांना आकर्षित आणि प्रभावित करतात. मग ती प्रवृत्ती बनते आणि शेवटी सवय आणि हेच नशीब निर्माण करतात.
◘हेच ठसे मनावर आणि शरीरावर नोंदवले जातात.
◘जेव्हा आपण एखादी कृती अहंकाराने करतो तेव्हा मन षडरिपूंचे वाईट ठसे निर्माण करतो.
◘जेव्हा आपण आत्म किंवा आत्म्याची जागरूकता ठेवून शरणागती पत्करून स्वत्व सोडून एखादी कृती करतो तेव्हा आपल्याला कोणतेही कर्म लागू होत नाही, ह्या कृतीला कर्मयोग म्हणतात.
◘चांगले कर्म किंवा वाईट कर्म हे दोन्हीही मनाच्या आवरणावर भार टाकतात आणि पुढील चढत्या प्रवासात अडथळे आणतात.
◘कर्मामुळे आपण ह्या पृथ्वीतलावर एक आत्मा म्हणून अडकले आहोत आणि वरती जाऊ शकत नाही.
◘कर्मामुळे जीवन व मृत्यु ही साखळी चालू रहाते.
◘या जन्माचा मुख्य उद्देश म्हणजे कर्म साफ करून, जीवन चक्राची साखळी तोडून परत आपल्या निवासस्थानी म्हणजे प्रकाशाकडे जाणे हा आहे.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...