अद्ययावत
-
जुलै २१, २०२४
गुरुपौर्णिमा उत्सव
गुरूपौर्णिमा हा विपुल कृपा आणि आशीर्वादाचा दिवस आहे. आपल्या गुरु आणि गुरु परंपराप्रती आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आहे. ऋषी म्हणतात प्रकट झालेल्या प्रकाशाचे सार, गुरुतत्व हे अव्यक्तातून येते आणि हे सार काही मोजक्या लोकांनाच प्राप्त होते. हे भाग्यवान लोक दैवी महात्मे बनतात आणि या जगात अध्यात्मिक चेतना वाढविण्याचे काम करतात. या गुरूपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण या दैवी महात्म्यांचा सन्मान करुन साजरा करतो.
ब्रम्हर्षि हरमिटेजच्या ध्यानकर्त्यांनी गुरूपौर्णिमेचा दिवस अपार प्रेम, कृतज्ञता व भक्तीने साजरा केला. गुरुदेव देवात्मानंद शंबला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ध्यान केले व उच्च स्तरावरील महान गुरुंची कृपा व आशीर्वाद प्राप्त केले.
आदल्या दिवशी, ध्यान करणाऱ्यांसाठी विविध क्रिया व मुद्रांद्वारे त्यांची अध्यात्मिक साधना वाढविण्यासाठी एक क्रिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. -
३० जून, २०२४
ब्रम्हर्षिज हरमिटेज, चिक्कगुबी, बंगलोर यांच्यामार्फत मोफत आयुर्वेदिक वैद्यकीय शिबिराचे आयोजन
ब्रम्हर्षिज हरमिटेज या संस्थेचे संस्थापक श्री देवात्मानंद शंबला यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आयुर्वेदिक वैद्यकीय शिबिर ३० जून २०२४ रोजी चिक्कगुबी, बंगलोर येथे घेण्यात आले. ह्या शिबिराचे हेच उद्दिष्ट होते की जनमानसातील आयुर्वेदाची प्रतिमा व रोगनिदान करून बरे करण्याच्या कार्यात असलेला महत्वाचा वाटा, दैनंदिन जीवनशैली याबद्दल लोकांची जागृती व्हावी.
तज्ञ वैद्य व ब्रम्हर्षिज हरमिटेजचे स्वयंसेवक व सहाय्यक यांनी विविध वयोगट व वेगवेगळ्या आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या ४४ लोकांना मोफत आयुर्वेदिक वैद्यकीय सल्ला व औषधे दिली. चिक्कगुबी या छोट्या गावातील अनेक लोकांनी या शिबिरात हजेरी लावली. या शिबिरातील सर्व वैद्यकीय सल्ले, मागदर्शन व तपासण्या या अतिशय सुरक्षित ठिकाणी पार पडल्या व वारंवार अशी शिबिरे घेण्यात येतील आणि सहभागी झालेल्या सगळ्यांना सतत आधार मिळेल अशी ग्वाही देण्यात आली.
या कार्यक्रमाद्वारे पारंपरिक आरोग्य सेवा पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले, ज्यामुळे आयुर्वेदाचे मूळ असलेल्या आरोग्य विज्ञानामध्ये निरोगी भविष्यातील समुदायाचा मार्ग मोकळा झाला. -
जून 21, 2024
सत् -ज्ञान योग साधना
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमच्या स्वयंसेवकांनी सत्-योग साधना शिबिर, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगलोर येथील प्रांगणात मध्ये घेतले. या मध्ये १३० विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. गुरुदेव देवात्मानंद शंबला तिथे उपस्थित होते. त्यांनीही सहभागी असलेल्यांना ध्यान शिकवले आणि अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
-
जून 10 - 14, 2024
सत् -ज्ञान योग साधना
ब्रम्हऋर्षिज हर्मिटेज या संस्थेतर्फे URSC, ISRO, बंगलोरच्या ISITE या संस्थेच्या प्रांगणात मध्ये "सत्- ज्ञान योग साधना" याचे शिबिर घेण्यात आले.
-
८ मार्च २०२४
महाशिवरात्रि
महाशिवरात्र हा एक अद्वितीय आणि उल्लेखनीय असा सण आहे. हा सण एखाद्याच्या जीवनात आणि जगामध्ये अंधःकार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण करून देतो. अध्यात्मिक साधकांसाठी, विशेषतः ध्यान करणाऱ्या साधकांसाठी ही एक महान व महत्त्वपूर्ण अशी रात्र आहे. कारण ती ध्यानधारणा करणे, ऊर्जांचा अनुभव घेणे, कर्म दहन करणे व आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी एक महत्त्वाची वेळ आहे.
महाशिवरात्रीचा सण या वर्षी ८ मार्च २०२४ या दिवशी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात करताना पार्श्वभूमीवर "शिवरक्षा स्तोत्र" ह्या भगवान शिवांच्या शक्तिशाली मंत्राचे वादन झाले. यानंतर गुरुदेव देवात्मानंद शंबला यांच्या विधिवत मार्गदर्शनाखाली पंचाक्षरी मंत्राचा जप, ध्यानातून समाधी पर्यंत, बिल्वार्पण पूजा, इत्यादी तंत्रांचा सराव सत् संगासाठी जमलेल्या लोकांनी या शुभ रात्रीला केला.
याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामुळे साधकांना जागं राहण्यास मदत झाली. शनिवार दिनांक ९ मार्चला पहाटे ५.३० वाजता कार्यक्रमाची सांगता झाली. साधकांनी त्यांचे अनुभव सांगितले व गुरुदेवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त करून घेतले. -
सप्टेंबर 20 - ऑक्टोबर 1, 2023
चार धाम यात्रा
श्री देवात्मानंद शंबला यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ६० सदस्यांनी (ध्यान न करणारे आणि ध्यान करणारे) गुरुंसह चार धाम यात्रेत सहभाग घेतला होता. विविध शक्तिशाली दैवी ऊर्जा केंद्रांना भेट देण्याची संधी या सप्टेंबर महिन्यातील चार धाम यात्रेत या साधकांना मिळाली. ही यात्रा खास कर्मदहनासाठी होती. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ याव्यतिरिक्त उत्तरकाशी, धारीदेवी मंदिर, रुद्र प्रयाग, व्यास गुहा आणि वशिष्ठ गुहा या ठिकाणांना भेट दिली.
-
जुलै 3, 2023
गुरुपौर्णिमा उत्सव
गुरुपौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते, एक पारंपारिक उत्सव आहे. हा उत्सव ज्ञानी किंवा गुरूंना समर्पित आहे. जेव्हा साधक त्यांच्या अध्यात्मिक गुरूंना आदर आणि कृतज्ञता अर्पण करतात, तेव्हा त्यांच्या जीवनातील हा सर्वात शुभ दिवस असतो. हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आषाढ महिन्यात शुद्ध ऊर्जा थेट परब्रम्ह लोकातून उतरतात. यावर्षी सोमवार दिनांक ३ जुलै रोजी विवेकानंद धाम येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस अत्यंत पवित्र पद्धतीने साजरा करण्यात आला.
-
मे 20 - 22, 2023
तपस - स्तर १, (तुकडी २) | अखंड ध्यान (भगवान कल्की जयंती)
मे २० व २१ रोजी, या दोन दिवसांमध्ये वरील उपक्रम राबवला गेला. या कार्यक्रमा दरम्यान श्री देवात्मानंद शंबला यांनी विशेष ध्यान करवून घेतले. व्यायाम, क्रिया, योगासने, सूर्यनमस्कार, पूर्वा ध्यान क्रिया या पूर्वी शिकवलेल्या पद्धतीमध्ये सुधारणा केल्या गेल्या. २२ मे रोजी सकाळी ६.३० ते दुपारी १२.३० अखंड ध्यान घेतले गेले. या दिवशी भगवान कल्की जयंती असल्यामुळे, हा दिवस अतिशय शुभ होता.
-
मे 18, 2023
गुरुजी कृष्णानंद जयंती
विवेकानंद धाम येथे १८ मे रोजी, गुरुदेव कृष्णानंद यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ११.३०- ते दुपारी १.०० या वेळात विशेष ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. श्री देवात्मानंद शंबला यांनी ध्यान मार्गातील साधकांशी ऑनलाइन संपर्क साधला आणि सगळ्यांना आशीर्वाद दिला.
-
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...