ध्यान | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

ध्यान


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

ध्यान ही आपले मन, शरीर आणि बुद्धी शांत करण्याची आंतरिक सराव व यंत्रणा आहे. हे एक शरीराची प्रभावी स्थिरता, एकाग्रता आणि दृश्यता यांचा परिणाम आहे. हे अष्टांग योगाचे सातवे अंग आहे.

ध्यान हे खूप प्राचीन आणि प्रगत असे अध्यात्मिक शास्त्र आहे जे ऋषींनी कर्मे जाळून परिवर्तन करण्यासाठी तसेच आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे नेण्यासाठी दिले आहे. हे आपल्याला संतुलित जीवन जगण्यासाठी मदत करते आणि अंतिम मुक्ती प्राप्त करण्यासाठी पात्र करते.

ध्यान हे आपल्याला आताच्या क्षणाशी पूर्णपणे जोडून ठेवते तरीसुद्धा बाह्य जगापासून आपल्याला दूर ठेवते. ध्यान हे आपल्याला विचार आणि इंद्रियाच्या दूर जाणीव ठेवायला मदत करते.

वाचन सुरू ठेवा ...

ध्यान करताना आपण जाणीवपूर्वक आपली जागरूकता ही 'विचारा' वरुन 'भावना' आणि अनुभव यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आणि जसजसे आपण ऊर्जेचा अनुभव घेतो, आपली स्थिरता खोलवर जाते, जागरूकता वाढते आणि आपण एकत्व प्राप्त करतो तसेच प्रकाशाचा थेट अनुभव घेतो.

ध्यान आपल्या शरीराची सर्व यंत्रणा दुरुस्त करून शरीरातील अनेक अध्यात्मिक क्रियांना सक्रिय करते. आपले शरीर हे वैश्विक ऊर्जेसाठी ग्रहणक्षम बनवते. आपले वैयक्तिक जीवन समृद्ध करते आणि जैविक व अध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारच्या सामुहिक उत्क्रांतीमध्ये योगदान देते.

आपल्या ध्यानामुळे जे दैवी कंपन घडते, त्यामुळे केवळ आपल्यामध्येच परिवर्तन घडते असे नाही तर त्याचा परिणाम आपल्या कुटुंबातील सदस्य, शेजारी, आजूबाजूचा परिसर आणि जगावरही होतो. ध्यानाने आपण परमात्म्याचे एक परिपूर्ण माध्यम बनतो. ते प्रकाशाच्या वास्तविकतेमधे जागृत होते. आपले जीवन हे अधिक सुंदर व अर्थपूर्ण बनवते.

ध्यान आणि सकारात्मकता हे एकमेकांशी जोडलेले आहे, दोन्ही एकमेकांना मदत व आधार देतात. जेव्हा कठीण व परीक्षेचा काळ असतो तेंव्हा सकारात्मकतेचे पालन करण्यासाठी ध्यान आपल्याला आंतरिक शक्ती व इच्छाशक्ती पुरवते. सकारात्मकतेची आवर्तने आपल्याला चांगल्या प्रतीचे ध्यान व समाधीचा अनुभव घेण्यासाठी मदत करतात. हे लक्षात ठेवा की ध्यान आणि सकारात्मकतेच्या एकत्रित प्रयत्नांनीच आपण आपल्या मधील षडरिपूंचा नाश करू शकतो.

सकारात्मकता सत्वगुण आणते तर ध्यानाची प्रक्रिया आपल्याला सर्व गुणांच्या पलीकडे जाण्यास मदत करते आणि आपल्याला अंतिम मुक्ती मिळवण्यासाठी पात्र बनवते म्हणून ध्यान व सकारात्मकता या दोन्ही गोष्टींना समान महत्व दिले पाहिजे व त्यांचा एकत्रितपणे सराव केला पाहिजे. ते साधनेच्या दोन डोळ्यांसारखे आहेत जे आपल्याला अध्यात्मिक व भौतिक समृद्धीसाठी संपूर्ण व संतुलित दृष्टी देतात.

ध्यान करताना आपण जाणीवपूर्वक आपली जागरूकता ही 'विचारा' वरुन 'भावना' आणि अनुभव यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आणि जसजसे आपण ऊर्जेचा अनुभव घेतो, आपली स्थिरता खोलवर जाते, जागरूकता वाढते आणि आपण एकत्व प्राप्त करतो तसेच प्रकाशाचा थेट अनुभव घेतो.

जैविक फायदे :


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

ध्यानाचा सतत व परिणामकारक सराव आपल्याला सक्षम बनवतो -

थकवा, काळजी, राग व तणाव दूर करतो.

शरीर प्रक्रिया दुरुस्त करून संपूर्ण आरोग्य व जीवनाची गुणवत्ता सुधारतो.

मन शांत ठेवतो, श्वास व रक्तदाब नियंत्रित ठेवतो.

मनाला स्पष्टता, बुद्धीला विवेक व शरीराला चैतन्य जोडतो.

सर्जनशीलता व एकाग्रता वाढवतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढून दिवसभर उत्साही राहाण्यास मदत करतो.

ग्रंथींचे कार्य आणि परिणामकता सक्रिय बनवतो.

मेंदूच्या निष्क्रिय पेशी सक्रिय करून स्मरणशक्ती वाढवतो.

आनंद, समाधान आणि शांती मिळते.

ध्यान करतांना मनातले विचार किंवा त्यांचा वेग कमी होतो.


अध्यात्मिक फायदे :


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

आपली कर्मे नष्ट करण्यासाठी तसेच आपल्यामधील षडरिपूंचा नायनाट करण्यासाठी मदत करतो.

आत्म्यामधील निःस्वार्थ प्रेम व आनंद बाहेर काढण्यासाठी मदत करतो.

परिवर्तन आणि सकारात्मकता

जीवनातील उच्च उद्देशांसाठी जागृत करतो.

शांतता व मनःशांती स्थापित करतो.

सर्व स्तरांवर पवित्रता येते.

सतर्कता व जागरूकता वाढते.

जीवनातील परिस्थिती हाताळण्यासाठी आंतरिक शक्ती आणि परिपक्वता येते.

चक्रे कार्यक्षम आणि स्वच्छ होतात आणि आपल्याला वैश्विक ऊर्जेच्या साठ्याला जोडण्याला मदत होते.

प्राणमय कोषाची किंवा महत्वाच्या शरीराची दुरुस्ती होते आणि नाड्या भरून जातात.

अंतर्ज्ञान, स्पष्टकारकता, इंद्रियाशिवाय एखादी गोष्ट समजणे यासारख्या सुप्त प्रक्रिया सक्रिय होतात.

देवांशी आणि ऋषींशी आपले संबंध पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होते.

आपल्याला 'समाधी' ह्या साधनेतील उच्च अवस्था गाठण्यासाठी मदत होते.

मनुष्य जन्मातील अंतिम उद्देश म्हणजे मुक्ती मिळवण्यासाठी मदत होते.

अतिरेक टाळा व भौतिक आणि अध्यात्मिक जीवनात समतोल राखा.