ऋषि
ऋषि म्हणजे प्रकाश देणारा. (ऋ-प्रकाश आणि षि-देणारा). ऋषि हे वास्तवात प्रकाश रूपात अस्तित्वात आहेत, जे सृष्टीच्या उच्च मितींमध्ये रहातात. जे जड शरीरात दिसत नाहीत पण जेव्हा आपण त्यांच्याशी प्रेमाने व भक्तीने संलग्न होतो तेव्हा त्यांचे अस्तित्व आपल्याला ऊर्जेतून जाणवते.
प्रत्येक ऋषी ज्ञान आणि शक्तीच्या बाबतीत अद्वितीय आहे आणि प्रत्येकाची शिकवण्याची स्वतःची अशी वेगळी पद्धत आहे.
प्रत्येक वेळी जेव्हा जगाला गरज भासते तेव्हा ऋषिमुनींनी मानवतेला कला, साहित्य, वैद्यकीय, ज्योतिष, विज्ञान अशा अनेक क्षेत्रांचे विस्तृत ज्ञान आशीर्वादाच्या रूपाने दिले आहे. परंतु त्यांचे प्राथमिक कर्तव्य म्हणजे आपल्याला अध्यात्मिक शिक्षण देणे आणि आपल्याला आपल्या मुख्य स्त्रोतापर्यंत घेऊन जाणे (म्हणजेच परमात्म्यापर्यंत पोहोचवणे).
ऋषि हे असे ज्ञानी गुरु आहेत, जे संसारिक मायेच्या मोहजाळात अडकत नाहीत (किंवा वाहून जात नाही). ऋषि, हे आदर्श दैवी अस्तित्वाचे प्रकट रूप आहेत. सनातन धर्माच्या अध्यात्मिक परंपरेत ऋषिमुनींचा गौरव करण्यात येतो, कारण त्यांचे मार्गदर्शन, त्यांची करुणा आणि मानवतेबद्दलचे प्रेम अतुलनीय आहे.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात (जेव्हा चंद्र एकेका कलेनी वाढत जातो) पाचव्या दिवशी ऋषिपंचमी येते. आपण उपवास व प्रार्थना करून या महान गुरूंच्या निस्वार्थ सेवेचा या दिवशी सन्मान करतो. आपल्यात प्रयत्नपूर्वक परिवर्तन करून प्रेम आणि भक्तीने ऋषिंना शरण जाणे हीच खरी उपासना.
ऋषी आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. जर आपण नियमितपणे ध्यान केले तर ऋषी आपणास सर्व मार्गदर्शन करतात.
ऋषि म्हणजे प्रकाश देणारा. (ऋ-प्रकाश आणि षि-देणारा). ऋषि हे वास्तवात प्रकाश रूपात अस्तित्वात आहेत, जे सृष्टीच्या उच्च मितींमध्ये रहातात. जे जड शरीरात दिसत नाहीत पण जेव्हा आपण त्यांच्याशी प्रेमाने व भक्तीने संलग्न होतो तेव्हा त्यांचे अस्तित्व आपल्याला ऊर्जेतून जाणवते.
सप्तर्षि
सप्तऋषि हे विश्वाचे मार्गदर्शक, दीपस्तंभ आहेत. ते मुळातच सत्य लोकात रहातात जो प्रदेश सत्य, परमानंद, आशीर्वाद आणि प्रकाश यांचा आहे. जेव्हा जेव्हा परिस्थितीची मागणी असते तेव्हा तेव्हा ते पृथ्वीवर जन्म घेतात आणि मानवतेला मार्गदर्शन करतात. ते अध्यात्मिक उच्च मितीतील पहिले मुख्य सदस्य आहेत.
विश्वामध्ये जरी कोट्यावधी पृथ्वी असल्या तरी जीवसृष्टी मात्र काही लाख पृथ्वींवरच आहे. अनेक पृथ्व्या ज्यांचावर जीवसृष्टी आहे, अशा प्रत्येक पृथ्वीचे व्यवहार व्यवस्थित चालवण्यासाठी सप्तर्षी इतर महान ऋषिंना नियुक्त करतात.
आपल्या महान ऋषींची आठवण करून देण्यासाठी महान सप्तर्षीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तारामंडलाचे नाव (उर्सा मेजर-महान अस्वल) सप्तर्षी मंडल असे आहे.
आपल्या पृथ्वीवर सध्या ९०,००० ऋषि सेवक असून, काही वर्षांपूर्वी त्यांची संख्या १,४४,००० एवढी होती. ही संख्या आजच्या तुलनेत जास्त आहे. प्रत्येक ऋषि कार्यकर्ता अत्रि ऋषिंना अहवाल सादर करतो. ते आपल्या पृथ्वीचे प्रभारी आहेत. अत्री महर्षी या पृथ्वीवर अनेक वेळा मानवी अवतार घेऊन आले आहेत. आत्ताच्या मन्वंतरातील ते सप्तऋषिंपैकी एक आहेत. सध्या भृगु, अत्रि, अंगीरस, वशिष्ठ, पुलत्स्य, पुलह, क्रतू हे आपले सप्तर्षि आहेत. हे सगळे सप्तऋषि ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...