स्वातंत्र्य
◘स्वातंत्र्य ही आत्म्याची मूलभूत अभिव्यक्ती आहे.
◘जेंव्हा आपण स्वतः म्हणजे आत्मा प्रणाली वर राज्य करतो किंवा त्या नुसार वागतो, तेंव्हाच स्वातंत्र्य अस्तित्वात येते.
◘आपण आपल्या विवेकानुसार अनुसरण करतो तेंव्हाच स्वातंत्र्य शक्य होते.
◘स्वातंत्र्य हे भीती, चिंता व कर्माच्या प्रभावाशिवायचे अस्तित्व किंवा ओळख आहे.
◘स्वातंत्र्य हे आपल्या जुन्या आणि निरोपयोगी सवयी आणि सर्व बंधनावर मात करीत असते.
◘जेव्हा एकाचे स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला बाधा आणत असेल तर कर्म निर्माण होते.
◘आत्म्याच्या पूर्ण प्रवासानंतर जेव्हा त्याला शेवटी स्वातंत्र्य मिळते तेव्हा त्याला मुक्ती किंवा पूर्ण स्वातंत्र्य असे म्हणतात.
स्वेच्छा
◘आत्म्याला मिळालेल्या स्वेच्छा या देणगीमुळे त्याला निवडीचे स्वातंत्र्य आहे.
◘आत्म्याला सृष्टीतील विविधता स्वेच्छेमुळे अनुभवता येते.
◘या स्वेच्छेमुळेच प्रत्येक आत्म्याला वेगळेपण प्राप्त होते.
◘आत्म्याने केलेल्या कुठल्याही निवडीबद्दल मत बनवलं जात नाही अथवा काही लादलंही जात नाही.
◘कुठल्याही कर्माची फक्त निवड ही कर्म आकर्षित करत नाही, पण त्या कर्माच्या निवडीमुळे जी कर्म घडतात व त्यामुळे जे परिणाम होतात त्याला कर्माचे नियम मात्र लागू होतात.
आत्मसमर्पण
◘आत्मसमर्पण म्हणजे आपल्या अहंकाराचे समर्पण.
◘आत्मसमर्पण म्हणजे ईश्वर इच्छेपुढे संपूर्ण शरणागत होणे.
◘आत्मसमर्पण म्हणजे जीवनात आलेली परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारणे.
◘आत्मसमर्पण हे फक्त प्रेम आणि पूर्ण श्रद्धा असेल तर शक्य आहे.
◘आत्मसमर्पणामध्ये जीवनातील घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग असतो, निष्क्रिय माघार नसते.
◘संपूर्ण आत्मसमर्पणामध्ये आपल्याकडून कर्म घडत नाहीत.
◘आत्मसमर्पण हा देवाजवळ सहज पोचण्याचा अतिशय साधा व सोपा मार्ग आहे.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...