शंबला
शंबला ही कल्पित गोष्ट नाही. ही प्रकाशाची नगरी आहे. ह्याची निर्मिती दुस-या मन्व॔तरामध्ये झाली. शंबला ही आपल्या पृथ्वीचाच एक भाग आहे पण ती सूक्ष्म पातळीवर अस्तित्वात आहे आणि उघड्या डोळ्यांना दिसत नाही. आर्यावर्त खो-यात, ते प्रकाशाच्या तरंगत्या गोलाकाराच्या रूपात जमिनीसह अस्तित्वात आहे. पूर्वी ते गोबी वाळवंटात होते आणि आता ते भूतान प्रदेशात आहे.
शंबला शहराची निर्मिती ही प्रामुख्याने ऋषींसाठी करण्यात आली परंतु नंतर ती विविध उद्देशांसाठी अवतार, देवता आणि विशेष आत्म्यांसाठी देखील विस्तारित करण्यात आली. ह्याच्या निर्मितीनंतर मार्कंडेय महर्षींना लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यकर्त्यांची निवड करावी लागली. शंबलाचे शासक म्हणून महान आत्म्याची निवड करण्यात आली, ज्यांना शंबलाचे मैत्रेय असे नाव देण्यात आले. शंबलामध्ये असे ५,६ मैत्रेय आहेत ज्यामध्ये स्वतः भगवान मैत्रेय जे शंबलाचे राजा आहेत आणि भगवान कल्कि यांचा समावेश आहे. भगवान कल्कि हे शंबलाचे सर्वोच्च मैत्रेय आहेत आणि ते आपल्या ऊर्जेशी संलग्न झालेल्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत. सगळ्या मैत्रेयींना आपल्या पृथ्वीसह विविध जगाशी संबंधित काम दिलेले आहे.
शंबला ही कोणत्याही धर्माची जागा नाही. आपणही ह्या जगात राहूनही शंबलाकर बनू शकतो. जर अधिक लोकांमध्ये बदल घडून आला तर शंबला आणि उरलेल्या जगामधील सीमारेषा कमी होतील. संपूर्ण जग शंबला बनून सुवर्ण युगाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. सत्ययुगामध्ये, संपूर्ण पृथ्वी ही शंबला होईल.
त्याच्या निर्मितीमागील कथा
भगवान शंकर यांनी दिलेल्या वरदानामुळे मार्कंडेय महर्षींनी स्वतःची प्रलयातून सुटका करून घेतली. आपल्या पाण्याने व्यापलेल्या पृथ्वीवर हजारो वर्षे अंधारात घालवल्यानंतर, एके दिवशी मार्कंडेय महर्षींना झाडाच्या एका पानावर एक निळ्या रंगाचे बाळ तरंगताना दिसले. त्यांच्या लगेच लक्षात आले की हे बाळ दुसरे, तिसरे कोणी नसून स्वतः भगवान विष्णू आहेत. भगवान विष्णूंनी त्यांना आपल्या वैश्विक रूपात दर्शन दिले आणि त्यांना सूचना दिल्या की लवकरच पृथ्वीवरील पाणी कमी होईल आणि इथे लवकरच एक भूमी तयार होईल. निळ्या रंगाच्या बाळाच्या प्रकटीकरणाच्या स्मरणार्थ त्या जमिनीचे नाव श्याम बाळ द्वीप असे ठेवण्यात आले. कालांतराने हेच शहर, शंबला म्हणून ओळखले जाऊ लागले.
शंबलाची वैशिष्ट्ये
प्रेम आणि एकता ह्यांनी संपूर्ण शंबलामधे प्रभुत्व मिळवले आहे. शंबलाचे नागरिक हे प्रकाशच घेऊन फिरतात. प्रकाश ही त्यांची प्रेरक शक्ती आहे जी त्यांना दैनंदिन जीवनामध्ये मार्गदर्शन करते. ते शंबलाचे कायदे व तत्वे अत्यंत परिश्रमपूर्वक पाळतात. तिथे 'प्रेम नाही' ही स्थितीच नाही. तेथील प्रत्येक कानाकोपरा फक्त प्रेमाने भरलेला आहे. शंबलाचे हे वैशिष्ट्य आहे की लोकांच्या मनात एकता आहे. ते खुप ज्ञानी व शक्तिशाली आहेत, कमालीचे सृजनशील आणि सर्व जगाला मदत करण्यासाठी कायम तत्पर आहेत. ते नेहमी सुंदर व तरुण राहतील असे मानले जात आहे. शंबला शहर सोनेरी रंगाचे असल्याचे म्हटले जाते व तेथे राहणारे लोकं ही तसेच आहेत. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता इथे नाही म्हणून ह्या शहराला आदर्श शहर म्हटले जाते. ह्याच्या शक्तिशाली अशा संरक्षण कवचामुळे नकारात्मकतेचा अणू एवढा छोटा भाग ही शंबलाच्या जवळ जाऊ शकत नाही.
शंबलाचे दरवाजे हे सर्व प्राणीमात्रांसाठी खुले आहेत. ते सर्व अमर्त्य आणि चिरंजीवांचे घर आहे. शंबलामधे जाण्यासाठी कैलास हा प्रवेश मार्ग आहे असे काही लोकांना वाटते. या पवित्र शक्तींमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अनेक तिबेटी लोक त्यांच्या प्रदक्षिणेच्या वेळी सतत 'ओम मणी पद्मे हम' असा जप करताना दिसतात.
शंबलामधे प्रवेश
विद्वान आणि अध्यात्मिक लोकांमध्ये 'शंबलामध्ये प्रवेश' हा संशोधन केलेला विषय किंवा सराव आहे. पृथ्वीवरच्या जीवनाची भरभराट झाली, अधर्मही वाढला म्हणूनच शंबला हळूहळू सामान्यांना दुर्लभ झाली. शंबलाच्या सुरक्षिततेसाठी प्रकाशाचे व ऊर्जेचे भोवताली स्तरावर स्तर घालण्यात आले. याचा अर्थ असा नाही की तो कायमचा कोणाला आत जाण्यासाठी बंद आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सर्व स्तरांवर शुद्ध होते तेव्हा तो शंबलामधे प्रवेश करण्यास पात्र ठरतो पण हे सुद्धा खरे आहे की देवाच्या इच्छेशिवाय व बोलावल्याशिवाय शंबलामधे कोणीही शारीरिक व सूक्ष्म स्तरावर प्रवेश करु शकत नाही. तिथे कोणीही सहज प्रवेश करु शकत नाही. तेथील कायदे कडक आहेत आणि दरवाजे एकदम पक्के.
शंबला ही कोणत्याही धर्माची जागा नाही. आपणही ह्या जगात राहूनही शंबलाकर बनू शकतो. जर अधिक लोकांमध्ये बदल घडून आला तर शंबला आणि उरलेल्या जगामधील सीमारेषा कमी होतील. संपूर्ण जग शंबला बनून सुवर्ण युगाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. सत्ययुगामध्ये, संपूर्ण पृथ्वी ही शंबला होईल.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...