काळ
वेळ हा देवाच्या सृष्टीतील एक शाश्वत पैलू आहे.
काळाचा उल्लेख 'कालचक्र' म्हणून केला जातो. 'काळ' म्हणजे वेळ आणि चक्र म्हणजे चाक. कालचक्र हे चाक किंवा काळाचे चक्र दर्शवते.
परब्रह्माच्या समतल किंवा प्रकाशाच्या क्षेत्रात वेळेची संकल्पना नाही. जेव्हा सृष्टी प्रकाशातून निर्माण झाली तरी ती फिरणाऱ्या आणि चक्राकार फिरणाऱ्या ऊर्जा कणांमध्ये होती. प्रत्येक ऊर्जा कण हा परिभ्रमण व क्रांतीचा उत्कृष्ट नमुना होता आणि परिभ्रमण व क्रांती किती लवकर पूर्ण झाली यातील फरकांमुळे वेळेची संकल्पना निर्माण झाली.
या ऊर्जा कणांनी वस्तुमान आणि घनता एकत्रित केली कारण ते इतर कणांकडे ओढले गेले ज्यामुळे ग्रह, उपग्रह, तारे आणि आकाशगंगा निर्माण झाल्या. त्याचा परिणाम म्हणजे सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला चक्रीय पैलू आहे त्यामुळे वेळ ही चक्रीय आहे.
युगे
वेळेचा एक एक क्षण म्हणजे सेकंदाचा छोटा भाग जो अब्ज वर्षापर्यंत असतो.
१ मन्वंतर = ७२ महायुग
१ महायुग = ४ युगे
सत्ययुग = २०,००० वर्षे
त्रेतायुग = १५,००० वर्षे
द्वापारयुग = १०,००० वर्षे
कलीयुग = ५,००० वर्षे
संक्रमण कालावधी १८४० वर्षे
आता आपण 'वैवस्वत मन्वंतर' नावाच्या ७ व्या मन्वंतरामधील २९ व्या महायुगामध्ये आहोत.
संक्रमण आणि प्रलय
संक्रमण काळ हा कलीयुग आणि सत्ययुग यांना जोडणारा दुवा आहे. सत्ययुगाला सुवर्ण युग किंवा नव युग असेही म्हणतात. २८ व्या महायुगाचे कलियुग हे १४ मार्च १९७४ ला संपले आहे.
प्रलय ऊर्जा ही विश्वातून आपल्या पृथ्वी वर वर्षत आहेत त्यामुळे ही परिवर्तन प्रक्रिया सुलभ व सोपी होत आहे.
प्रलय ही परिवर्तनाची प्रक्रिया आहे. जर आपण प्रलय ऊर्जेचा बरोबर वापर केला तर हजारो वर्षांची कर्मे सुद्धा संक्रमण काळात जळून जातात. आपल्या शुद्धीकरण व सुधारण्याच्या क्रियेसाठी बरेच मंथन होते.
२०१२ च्या शेवटी सूक्ष्म स्तरावर चेतनेमध्ये फार मोठा बदल घडून आला. प्रलय ऊर्जा ह्या येत्या काही वर्षात उच्च स्तरावर पोहोचतील. येणारी वर्षे ही जागतिक परिवर्तनाबरोबर समांतरपणे वैयक्तिक परिवर्तनासाठी आहेत. सर्वच क्षेत्रात मुख्यत्वे करून राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात परिवर्तन घडेल.
एकदा प्रलयाचा कालावधी संपला की तिथे सुधारणा होतील, अधिक चांगल्या प्रणाली येतील. प्रलय प्रक्रियेमध्ये ऋषी तज्ञ आहेत. बऱ्याच मन्वंतरासाठी ते हे करीत आले आहेत. ते आपल्या पाठीशी आधारासाठी कायमच आहेत. सप्तर्षी हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी फार मोठी भूमिका बजावतात.
अंध:कार जरी दिसत असला तरी हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपल्या पृथ्वीने ७०% सत्ययुगात प्रवेश केला आहे. आपले ऋषी, सिद्ध पुरुष, योगी आणि प्रकाश कार्यकर्ते यांचे नि:शब्द प्रयत्न व समर्पणाबद्दल त्यांना अनेक अनेक धन्यवाद.
प्रलय ही परिवर्तनाची प्रक्रिया आहे. जर आपण प्रलय ऊर्जेचा बरोबर वापर केला तर हजारो वर्षांची कर्मे सुद्धा संक्रमण काळात जळून जातात. आपल्या शुद्धीकरण व सुधारण्याच्या क्रियेसाठी बरेच मंथन होते. अंध:कार जरी दिसत असला तरी हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपल्या पृथ्वीने ७०% सत्ययुगात प्रवेश केला आहे. आपले ऋषी, सिद्ध पुरुष, योगी आणि प्रकाश कार्यकर्ते यांचे नि:शब्द प्रयत्न व समर्पणाबद्दल त्यांना अनेक अनेक धन्यवाद.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...