श्री देवात्मानंद शंबला
श्री देवात्मानंद शंबला हे अतिशय ज्ञानी आणि अध्यात्मिक गुरू आहेत.आत्ता ते ऋषींच्या कार्यात गुंतलेले आहेत, अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणे आणि सप्तॠषी आणि सिद्धांच्या या दैवी मार्गात ख-या साधकांना ध्यान आणि सकारात्मकतेच्या तंत्राद्वारे मार्गदर्शन करणे.
प्रारंभिक आणि वैयक्तिक जीवन
त्यांच्या अध्यात्मिक शोधाची सुरूवात त्यांच्या वयाच्या ७व्या वर्षीच झाली, जेव्हा त्यांच्या आईने त्यांना भक्त मार्कंडेय व त्यांची भगवान शिवांबद्दलची अविचल भक्ती, त्यानंतर त्यांना अमरत्व मिळवण्यात व ब्रम्हॠषी बनण्यात कशी मदत केली हे सांगितले.त्यांच्या आईने सांगितलेल्या भक्त मार्कंडेय यांच्या वृत्ताचा देवात्मानंद शंबला यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.मार्कंडेयांवर गहन विचार करून त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाची सुरूवात झाली.देवात्मानंद शंबला यांच्या आई हाच त्यांचा प्रेरणा आणि प्रोत्साहनाचा खरा स्त्रोत होता कारण त्यांनी देवात्मानंद शंबला यांना सर्व अध्यात्मिक कार्यात सामील करून घेतलं होतं. दिवसेंदिवस त्यांचा देव आणि ऋषी यांच्याबद्दलचा उत्साह वाढत गेला.
जरी त्यांनी आयटी क्षेत्रातील करिअर , आनंदी व समाधानी कुटुंबासह सामान्य जीवनाचा अंगीकार केला असला तरी, त्याचबरोबर त्यांचा अध्यात्म्याचा पाठपुरावा आणि परमात्म्याशी असलेला संबंध वेळोवेळी वाढतच गेला.
देवात्मानंद शंबला यांनी सप्तर्षी व सिद्धांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २०१४ मधे ब्रह्मर्षी आश्रमाची स्थापना केली. ते प्रगत ध्यान पद्धती, योगासने,क्रिया,सकारात्मकतेची विविध अध्यात्मिक तंत्रे आणि साधकांना त्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी विविध उपचार पद्धती शिकवतात.
पहिली दिक्षा
वयाच्या २६ व्या वर्षी त्यांना वेथाथिरी महर्षीं जे स्वतः एक महान सिद्ध आणि गूढ गुरू होते,त्यांनी कुंडलिनी योगाची दिक्षा दिली. वेथाथिरी महर्षींनी सूक्ष्म देहानी त्यांना कर्मयोग शिकवला.वेथाथिरी महर्षींच्या महासमाधीनंतर, महावतार बाबाजींच्या आशीर्वादाने, २००७ च्या नोव्हेंबर मध्ये ते गुरूजी कृष्णानंद जे एक महान गुरू आणि सप्तॠषी होते, यांच्या संपर्कात आले आणि त्यांना ध्यान योगाची दिक्षा मिळाली.गुरूजी कृष्णानंद यांच्यामुळे त्यांना सप्तॠषी, विश्वामित्र महर्षि,महर्षि अमरा आणि इतर महत्वाचे ऋषी ज्ञात झाले. त्यांनी उच्च स्तरावरील दिक्षा,सूक्ष्मलोक आणि भौतिक क्षेत्राच्या पलिकडे असलेल्या इतर मितींबद्दल सुद्धा माहिती करून घेतली.
ऋषीत्वाचा पहिला स्तर
३ फेब्रुवारी २०११ ला गुरूजी कृष्णानंद आणि त्यांचे सूक्ष्म स्तरावरील गुरू महर्षि अमरा यांच्याकडून ऋषित्वाच्या पहिल्या स्तरावरील दिक्षा देण्यात आली आणि तेव्हापासून सूक्ष्म जगातील ऋषींचे कार्य पूर्ण करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला.
त्यांचे गुरू, गुरुजी कृष्णानंद यांच्या समाधी नंतर, त्यांनी त्यांचा ' माहिती व तंत्रज्ञान ' या विषयाचा व्यवसाय बंद केला आणि आपले जीवन ऋषीं व ऋषींच्या कार्याला समर्पित केले. तेंव्हापासून त्यांना भोगनादर सिद्धर, भारद्वाज महर्षी आणि वसिष्ठ महर्षी ह्यांनी सूक्ष्मपणे शिक्षण व मार्गदर्शन दिले.
ब्रह्मर्षीचे आश्रम
देवात्मानंद शंबला यांनी सप्तर्षी व सिद्धांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २०१४ मधे ब्रह्मर्षी आश्रमाची स्थापना केली. ते प्रगत ध्यान पद्धती, योगासने,क्रिया,सकारात्मकतेची विविध अध्यात्मिक तंत्रे आणि साधकांना त्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी विविध उपचार पद्धती शिकवतात.
देवात्मानंद शंबला हे नवीन साधकांना अध्यात्मिक दीक्षा आणि मार्गदर्शन देतात. अध्यात्मिक प्रगती व बदलाव यासाठी ते साप्ताहिक वर्ग घेतात व अधूनमधून अध्यात्मिक कार्यशाळा ही घेतात.
देवात्मानंद शंबला यांच्या शिकवणी व तंत्रे जरी साधी वाटली तरी ती शक्तिशाली आणि गहन आहेत, ज्यामुळे जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांना त्यांच्या अध्यात्मिक शोधात परिवर्तन,व सकारात्मक आणि सर्वोच्च अनुभव घेण्यास मदत झाली आहे. त्यांच्या शिकवणी ह्या त्यांच्या साधकांना बिनशर्त प्रेम आणण्यासाठी, जीवनातील समस्यांना तोंड देण्यासाठी, नम्रता राखण्यासाठी, एकता प्रस्थापित करण्यासाठी, परिवर्तन आणि परामात्म्याला शरण जाण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतात.
त्यांचा स्वभाव | त्यांचे प्रकल्प
देवात्मानंद शंबला यांचे अनुयायी, त्यांच्या गुरूंचे मैत्रीपूर्ण, प्रेम, करुणा व दयेने व नम्रतेने परिपूर्ण वर्तणूक असे वर्णन करतात. ते एक दैवी अवतार आहेत जे अध्यात्माला जीवनाचा एक मार्ग मानतात, जो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणीही करु शकतो. त्यांच्या स्वतःच्या दृश्यमान परिवर्तनाद्वारे त्यांचे स्वतःचे ज्ञानी व्यक्तिमध्ये कसे परिवर्तन घडले याबद्दल ते सांगतात.
देवात्मानंद शंबला हे जगाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी आणि पृथ्वीवरील मानसिक चेतना बदलण्यासाठी अनेक दैवी प्रकल्पांची मांडणी करण्यात देखील महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. भगवान कल्की व सप्तर्षीनी ह्याची विधिवत सुरवात केली व ह्यांना मार्गदर्शन ही केले. जगाच्या विविध भागांमध्ये दुर्मिळ अशा विशेष शक्तींचे रोपण करणे, अनेक सूक्ष्म कार्ये करणे हे सर्व ऋषींच्या कार्याचा भाग आहे, जे ते त्यांचे जीवनाचे ध्येय म्हणून पूर्ण करत आहेत.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...