+91 90712 92315 | contact@brahmarishishermitage.org | Find Us
दिव्य आध्यात्मिक शक्तींचा अनुभव घ्या
ब्रम्हर्षिज हर्मिटेज
Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis 
                    Divine Soul Guru
Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis 
                    Divine Soul Guru
ज्योती आराधना

ज्योती आराधना

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

प्रकाशाची आराधना दिव्याच्या रूपात करणे. ही प्रथा वैदिक काळापासून चालत आलेली आहे.

देवत्वाचे आवाहन करण्यासाठी व आपल्या प्रेरणेच्या उगमस्थानाशी जोडण्यासाठी, एक छोटी ज्योत प्रज्वलित करावी.

पंचतत्वांमध्ये अग्नीला सर्वात शुद्ध मानले गेले आहे ज्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे व संदेश पोचविण्याची क्षमता आहे. व्यक्त होण्याचा सिद्धांत या तंत्राने नियोजित केला जातो.

हा सराव आपण प्रार्थनेला बसण्यापूर्वी, साधनेपूर्वी, नामस्मरणापूर्वी. विशेष साधना काळात केला जाऊ शकतो, जसे सर्वात महत्त्वाची संध्याकाळ.

वाचन सुरू ठेवा ...

दिवा, हे तेल आणि वात ठेवण्यासाठी खास तयार केलेले पात्र आहे. पारंपारिक पद्धतीत, वैदिक काळापासून, ज्योत प्रज्वलित करण्यासाठी माती, पितळ किंवा चांदीचा दिवा वापरला जातो.

आपल्या देवघरात किंवा साधनेच्या ठिकाणी किंवा एखाद्या घरामधील शांत ठिकाणी, एक दिवा प्रज्वलित करावा. हा दिवा आपण आपल्या गुरूच्या इष्ट देवतेच्या चित्रासमोर किंवा आपल्या एखाद्या प्रेरणास्त्रोताच्या समोर, ज्याच्याशी आपल्याला अध्यात्मिक संलग्नता हवी असेल, अशा ठिकाणी ठेवावा.

दिवा प्रज्वलित केल्यावर आपण ज्यांची आराधना करणार आहोत त्यांचे धन्यवाद मानावेत आणि कृतज्ञता व्यक्त करुन, प्रार्थना करावी व काही काळ तिथे शांत बसावे.

थोड्याच वेळात, तुमच्या असे लक्षात येईल की, हे ठिकाण ऊर्जेने भारून गेले आहे, तसेच शांती व सौंदर्याने न्हावून गेले आहे, या ज्योतीमुळे आपल्या मधील चेतना, दैवी चेतनेशी जोडली गेल्याची जाणीव होते. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या जीवनात परमात्म्याला आमंत्रित करता व त्याच्याशी संवाद करू लागता.

दिव्यत्वाशी आपण जोडले गेलो आहोत, हा जोड मजबूत करण्यासाठी, आपण हा दिवा रात्रंदिवस तेवत ठेवू शकतो. यालाच अखंड ज्योती आराधना म्हणतात.

पंचतत्वांमध्ये अग्नीला सर्वात शुद्ध मानले गेले आहे ज्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे व संदेश पोचविण्याची क्षमता आहे. व्यक्त होण्याचा सिद्धांत या तंत्राने नियोजित केला जातो. अग्नी आकार व निराकार यामध्ये सेतूचे काम करतो. तो आपल्या आत्म्याला दैवी चैतन्याशी जोडतो.

उद्देश

आपल्याला जिथून दिव्य प्रेरणा मिळते, त्या स्त्रोताशी संपर्क साधणे आणि आपल्या साधनेत मदत मिळवण्यासाठी ज्योती आराधनेचा उपयोग होतो.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

कोण

याचा कोणीही, कधीही सराव करावा.

कुठे

घरात किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळी किंवा पूजेच्या ठिकाणी करावा.

कधी

हा सराव आपण प्रार्थनेला बसण्यापूर्वी, साधनेपूर्वी, नामस्मरणापूर्वी. विशेष साधना काळात केला जाऊ शकतो, जसे सर्वात महत्त्वाची संध्याकाळ.

वेळ

किमान पाच मिनिटे.

फायदे

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

परमात्म्याला आवाहन करण्यासाठी व त्याच्याशी संवाद साधण्यासाठी.

साधनेचे स्थळ शुद्ध करणे आणि ती जागा शांततेने व दिव्य स्पंदनाने भरणे.

तुमच्या कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी अध्यात्मिक व भौतिक समृद्धी वृद्धिंगत करण्यासाठी.

अग्नी ज्ञानरूप आहे, कारण तो इतरांना दिल्याने कमी होत नाही. ही प्रथा आपल्याला उच्च ज्ञान देते आणि शिवाय आपली बुद्धी आणि विवेक शक्ती वाढवते.

अग्नि पूजेच्या स्थानाभोवती संरक्षक वलय तयार करते.

संबंधित चित्रफीत

आमचे अनुसरण करा