ध्यान
◘ध्यान शुद्ध शास्त्र आहे. ध्यान केल्याने मनाला विश्रांती मिळते. ध्यान म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी शांत करणे व आत्म्याचा आंतरिक प्रकाश जागृत करणे.
◘ध्यान आपल्याला आकाराच्या पलीकडे घेऊन जाते.
◘ध्यान केल्याने आपण सर्व बंधने व मर्यादांच्या बंधनातून मुक्त होतो.
◘काया स्थैर्यता व एकाग्रतेने ध्यान साध्य होते.
◘दैवी स्पंदनांचा अनुभव घेतल्यावर आपल्या जाणीवा विस्तारतात, विशालता पसरल्याने आपणास एकत्वाची जाणीव होते व प्रकाशाची अनुभूती होते.
◘ध्यान केल्याने कर्मांचा नाश होतो. जीवन हलके, सोपे, उद्देशपूर्ण, कार्यक्षम व शांत होते.
◘ध्यान केल्याने आपण जीवनावर प्रेम करू लागतो. स्वतः परिवार, समाज, विश्व याच्यात संपूर्णता जाणवते.
◘ध्यानामुळे सकारात्मकतेचा मार्ग मोकळा होतो.
◘ध्यानामुळे आपल्याला नवजीवन प्राप्त होते.
◘दीर्घकाळ व सखोल केलेले ध्यान म्हणजेच तप होय.
सकारत्मकता
◘सकारात्मकतेची सुरुवात विचारांची शक्ती समजून घेण्यापासून होते आणि आपल्या सर्व नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ही शक्ती कार्यरत होते.
◘आतून किंवा बाहेरून कोणतीही नकारात्मकता किंवा मनाचा कमकुवतपणा समोर आल्यावर लगेचच सकारात्मक विचारांचा प्रवाह देऊन हे साध्य होते.
◘शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्व स्तरांवर कुठल्याही नकारात्मकतेला थारा द्यायचा नाही.
◘सकारात्मकता म्हणजे जीवन आणि जीवनात येणा-या वेगवेगळ्या परिस्थितींबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे.
◘सतर्कता आणि परिवर्तन यांचा खरा हेतु सकारत्मकतेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो.
◘सकारात्मक मन हे नेहमी ताजे, उत्साही आणि इतरांसाठी प्रेरणा बनते.
◘सकारात्मक मन म्हणजे शुद्ध आणि कणखर मन कोणत्याही परिस्थितीत त्याची दिशाभूल होत नाही.
◘सकारात्मकतेशिवाय आपण कधीही खरे स्वातंत्र्य आणि खरा आन॔द अनुभवू शकत नाही.
◘आपल्यातील कमकुवत असणाऱ्या सगळ्या बाबींवर विजय मिळवण्याच्या क्षमतेची खरी जाणीव केवळ सकारात्मक विचारांवरच शक्य आहे.
परिवर्तन
◘कुठलाही बदल कायमचा व संपूर्णपणे होणे म्हणजे परिवर्तन.
◘स्वपरिवर्तन कर्मावर मात करण्याचा एक सखोल प्रयत्न आहे.
◘परिवर्तन म्हणजे जे नको असेल ते सर्व सोडून देणे.
◘स्वपरिवर्तन केलेली व्यक्ती कधीच परत जुन्या रूपाकडे परत येऊ शकत नाही म्हणूनच ती व्यक्ती कधीही संशयी अगर भयग्रस्त होऊ शकत नाही.
◘जेव्हा मनामध्ये परिवर्तन होते तेव्हाच खरे स्वपरिवर्तन घडते.
◘ परिवर्तन झालेली व्यक्ती ही इतरांसाठी आदर्श असते व आशेचा किरण असते.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...