+91 90712 92315 | contact@brahmarishishermitage.org | Find Us
दिव्य आध्यात्मिक शक्तींचा अनुभव घ्या
ब्रम्हर्षिज हर्मिटेज
Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis 
                    Divine Soul Guru
Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis 
                    Divine Soul Guru
गायत्री मंत्र

गायत्री मंत्र

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

ॐ भूर् भुवः सुवः।

तत्स॑वि॒तुर्वरेण्यं

भर्गो दे॒वस्य॑धीमहि ।

धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त् ।।

महर्षी विश्वामित्रांनी हा शक्तिशाली मंत्र दिला आहे. परब्रह्म किंवा सर्वोच्च प्रकाशाने गायत्री देवीच्या स्वरूपात प्रगट होऊन महर्षी विश्वामित्रांना दर्शन दिले. महर्षी विश्वामित्रांनी उन्नत अध्यात्मिक स्थितीची जाणीव करून देण्यासाठी मानवतेला ही भेट दिली. या मंत्राद्वारे आपण थेट गायत्री देवीकडून शुद्ध ऊर्जा मागू शकतो आणि प्राप्तही करू शकतो.

मूळत: गायत्री मंत्रात तीन श्लोक होते. आधीच्या महायुगात ( सत्य, त्रेता, द्वापार, कलियुग हे सर्व मिळून एक महायुग असते) माणसं शक्तिशाली होती आणि तीनही श्लोकांचे पठण करु शकत होती.

पृथ्वी (भुर्), ग्रह (भुवः) आणि आकाशगंगा (सुवः) अतिशय वेगाने फिरत आहेत आणि त्याद्वारे निर्माण होणारा आवाज म्हणजे ॐ. तो देव (तत्) जो अनेक सूर्यांच्या प्रकाशरुपाने प्रकट होतो, तो आदरास पात्र आहे (वरेण्यं). त्यामुळे, आपण सर्वांनी मिळून त्या देवाच्या प्रकाशाचे (भर्गो) ध्यान (धीमहि) करूया आणि ॐ मंत्राचा जप करूया. तो (यो) आपल्या (नाह) बुद्धीला (धीयो) योग्य दिशेने (प्रचोदयात) मार्गदर्शन करो.

अर्थ :

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

पृथ्वी (भुर्), ग्रह (भुवः) आणि आकाशगंगा (सुवः) अतिशय वेगाने फिरत आहेत आणि त्याद्वारे निर्माण होणारा आवाज म्हणजे ॐ. तो देव (तत्) जो अनेक सूर्यांच्या प्रकाशरुपाने प्रकट होतो, तो आदरास पात्र आहे (वरेण्यं). त्यामुळे, आपण सर्वांनी मिळून त्या देवाच्या प्रकाशाचे (भर्गो) ध्यान (धीमहि) करूया आणि ॐ मंत्राचा जप करूया. तो (यो) आपल्या (नाह) बुद्धीला (धीयो) योग्य दिशेने (प्रचोदयात) मार्गदर्शन करो.

आत्म्याने निर्देशित केल्याप्रमाणे योग्य निवड करून व जाणून घेऊन कार्य करणे हे बुद्धिद्वारे नियंत्रित केले जाते. बुद्धिवर जे आवरण बनते ते आत्मा आणि मन यांच्यामधील थर आहे.

या मंत्राद्वारे बुद्धीची भेदभाव करू शकणारी शक्ती सुधारण्यास व तीक्ष्ण होण्यास मदत होते. आपल्याला आंतरिक सूर्याला आमंत्रित करण्यास आणि देवत्व तेजस्वी करण्यासाठीही मदत होते.

उद्देश

बुद्धीला अशा प्रकारे प्रकाशमान करणे जेणेकरून विवेकबुद्धी (शक्ती) जागृत होईल.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

कोण

७ वर्षांवरील कोणीही

कुठे

घरात किंवा घराबाहेर

कधी

सूर्योदयाच्या वेळी, दुपारी आणि सूर्यास्ताच्या दरम्यान.

वेळ

२१/५१/१०८ वेळा जप करावा. हा जप सूर्योदय, दुपार किंवा सूर्यास्त कुठल्याही एका वेळी किंवा तिन्ही वेळी करावा.

मार्गदर्शक तत्त्वे

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

गायत्री मंत्राचा जप करताना मंत्राचा अर्थ आत्मसात करून, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून ध्यान केले पाहिजे. यांत्रिकरित्या जप केल्याने योग्य लाभ मिळत नाही.

योग्य स्वरात व स्पष्ट उच्चारणाने, मोठ्याने जप करता येतो, तथापि मनातल्या मनात नामस्मरण केल्याने साधनेत अधिक लक्ष व शक्ती मिळते.

फायदे

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

गायत्री मंत्राचा अखंड जप केल्याने आपल्याला खाली दिल्याप्रमाणे शारीरिक मानसिक व अध्यात्मिक लाभ होतो.

एकूण आरोग्य सुधारते.

मेंदूची कार्यक्षमता वाढते.

शरीरातून आणि मनातून थकवा, तणाव आणि वेदना काढून टाकण्यासाठी

आंतरिक मार्गदर्शन मिळते.

आत्मविश्वास वाढतो.

आशावादी होण्यास मदत होते.

योग्य निवड करण्यास मदत होते.

आपल्याला भूतकाळातील कर्मांचे ठसे नष्ट करण्यास मदत होते.

जागरूकता आणि सतर्कता यांच्या विस्तारीकरणासहित ध्यानाची गुणवत्ता सुधारण्यासाठी

अलिप्त राहण्यास.

विवेक बुद्धी मिळवण्यास.

आत्म्याच्या पातळीवर निर्णय घेण्यास.

धर्माच्या मार्गावर व आपल्या अध्यात्मिक ध्येयांमध्ये स्थिरता प्राप्त होते.

संबंधित चित्रफीत

आमचे अनुसरण करा