ओमकार ध्यान

ओमकार ध्यान


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

ओमकार हा एक मंत्र आहे. मंत्र म्हणजे एक ध्वनी जो विशिष्ट पद्धतीने उच्चारला जातो आणि ज्याला एक विशिष्ट स्वरुपाची स्पंदने असतात. संपूर्ण विश्व हे बाकी काहीही नसून निरनिराळ्या पातळ्यांवरचे ऊर्जेचे प्रतिध्वनी आहेत. जिथे स्पंदने आहेत तिथे ध्वनी असतोच. त्यामुळे सर्व विश्व एक ध्वनी स्वरूपात अगर अनेक ध्वनींचा गुंतागुंतीचा संयोगच म्हणावा लागेल.

ओम हा विश्वातील प्रथम ध्वनी आहे. जो विश्वातील अणू-रेणूत स्पंदन पावतो. हा ध्वनी ओम विश्वातील तीन प्रकारच्या स्पंदन स्वरूपातील अस्तित्वांचे प्रतिनिधित्व करतो. निर्मिती-(अ-अकार), भरणपोषण-(उ-उकार), विनाश-(म-मकार). त्यामुळे जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो तेव्हा नवीन ऊर्जा तयार होतात ज्या आतील मिळालेल्या जन्मजात उर्जांचे जतन करतात व शरीरात नको असलेल्या ऊर्जा घालवायला मदत करतात.

पूर्ण शांततेमध्ये ओमकार ध्वनी आपल्याला शरीरात ऐकू येतो, त्यामुळे त्याला शांततेचा ध्वनी असेही संबोधले जाते. ओमकाराचे उच्चारण सहजपणे मनातल्या मनात देखील करता येते.

ओम हा विश्वातील प्रथम ध्वनी आहे. जो विश्वातील अणू-रेणूत स्पंदन पावतो. हा ध्वनी ओम विश्वातील तीन प्रकारच्या स्पंदन स्वरूपातील अस्तित्वांचे प्रतिनिधित्व करतो. निर्मिती-(अ-अकार), भरणपोषण-(उ-उकार), विनाश-(म-मकार). त्यामुळे जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो तेव्हा नवीन ऊर्जा तयार होतात ज्या आतील मिळालेल्या जन्मजात उर्जांचे जतन करतात व शरीरात नको असलेल्या ऊर्जा घालवायला मदत करतात. ओमकार हा एक अतिशय प्रभावी मंत्र नाही तर एक संपूर्ण विज्ञानच आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

प्रक्रिया


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

स्वच्छ जागी बसा.

ओमकाराचे उच्चारण मोठ्याने किंवा मनात करा.

त्याच्या कंपनांचा अनुभव घ्या व ती सर्व शरीरात पसरू द्या.

उद्देश


प्रकाश उर्जेव्दारे संपूर्ण विश्वप्रणाली त्वरित दिव्यत्वाकडे नेण्यासाठी.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

कोण


कोणीही आठ वर्षावरील व्यक्ती करू शकतो.

कुठे


घरात किंवा बाहेर.

कधी


दिवसभरात कधीही, उपासाच्या दिवशी केल्याने आपल्या शरीरातील व मनाच्या ऊर्जेची पातळी राखली जाते व दिवसभर आपण परमात्म्याशी जोडले रहातो.

वेळ


दहा ते वीस मिनिटे.

फायदे


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपण स्वतःवर उपचार करू शकतो.

इतर कोणत्याही आरोग्याच्या समस्या व थायरॉईडची समस्याही आटोक्यात येते.

हृदय, रक्तवाहिन्यांच्या संबंधीत रोगांवर नियंत्रण आणू शकतो-आपल्या शरीराला व मनाला विश्रांती देऊन रक्तदाबावर नियंत्रण करू शकतो व हृदयाच्या ठोक्यांना लयबद्ध ठेवू शकतो.

आपल्या वोकल कॉर्ड व आजूबाजूच्या स्नायूंना ताकत मिळाल्यामुळे आपला आवाज सुधारतो.

आपण आपल्या अध्यात्मिक व भोतिक जीवनात समतोल साधू शकतो.

ओमकाराच्या सामुहिक उच्चारणामुळे त्या जागेतील स्पंदने भरपूर प्रमाणात वाढतात आणि आजुबाजुचे वातावरण ‌भारित होते व त्याव्दारे संरक्षक कवच निर्माण होते. याचा परिणाम एखाद्या मंत्राचा प्रभाव वाढविण्यासाठीही होतो. असे स्थळ ऊर्जेने भारित होते आणि देवत्व आकर्षित करण्यासाठीचे केंद्रही बनते.

सहज समाधी साधण्यासाठी ओमकार ध्यान नियमित करावे.