योग निद्रा
योग निद्रेला योगिक झोप असेही म्हणतात. ही एक जागृतता आणि स्वप्न यांच्यामधील जागरूकतेची अवस्था आहे. झोपेप्रमाणेच, बाहेरून आराम करताना आपण जाणीवपूर्वक अंतर्मनात सतर्क राहण्याचा प्रयत्न करतो.
येथे अंतर्बाह्य सतर्कता आपली जागरूकता 'विचारा'वरून 'भावने'कडे वळते आणि जेव्हा आपण शरीराच्या अंतर्गत ऊर्जेला अनुभवतो आणि त्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मानवी प्रणालीचे संपूर्ण पुनरूज्जीवन आणि उपचार होतो. आपल्या जागरूकतेमधे एक बदल आणि विस्तार होईल जो दैनंदिन साधनेला खुप मदत करेल.
योग निद्रेला योगिक झोप असेही म्हणतात. ही एक जागृतता आणि स्वप्न यांच्यामधील जागरूकतेची अवस्था आहे. झोपेप्रमाणेच, बाहेरून आराम करताना आपण जाणीवपूर्वक अंतर्मनात सतर्क राहण्याचा प्रयत्न करतो. हे तंत्र ऋषींनी संपूर्ण आरोग्य, पूर्ण कल्याण व अंतर्गत जागृतीसाठी दिलेला खुप जूना असा योगिक सराव आहे.
प्रक्रिया
तुमच्या पाठीवर आरामात आडवे व्हा आणि डोळे मिटून घ्या. तुमचे पूर्ण शरीर शिथिल करा.
तुमचे हात शरीराच्या बाजूला ठेवा. तळहात वरच्या बाजूला ठेवा आणि पायात थोडे अंतर ठेवून स्वस्थ रहा. थोडे संथ व दीर्घ श्वसन करा.
पायावर लक्ष केंद्रित करुन सुरुवात करा. पायावर लक्ष केंद्रित करा आणि जाणीवपूर्वक त्यांना आराम द्या. पायाशी ऊर्जाची जाणीव होऊदे व स्पंदन अनुभवा. तुमचा वेळ घ्या आणि जाणीवपूर्वक आराम करा.
आता लक्ष हळूहळू पोटऱ्यांच्या स्नायूंवर केंद्रित करा मग गुडघे आणि नंतर मांड्यांच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करा. शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करतो आहे ह्याची खात्री करा आणि हवा तेवढा वेळ घ्या. आता हळूहळू लक्ष कुल्ले आणि नंतर संपूर्ण खालच्या भागाकडे वळवा. तुमचा वेळ घ्या आणि जाणीवपूर्वक आराम करा.
आता लक्ष कुल्ल्यांच्या खालच्या बाजूला उदर, ओटीपोटाचा भाग, पोट आणि मग छातीचा सगळा भाग इकडे वळवा. तुमचा वेळ घ्या आणि जाणीवपूर्वक आराम करा.
हळूहळू तुमचे लक्ष खांदे, हात, मनगट, तळहात, बोटे यांच्याकडे वळवा आणि ताण दूर करून पूर्ण आराम द्या. आता लक्ष गळा, मान आणि चेहरा ह्याकडे वळवा. मग डोक्याकडे वळवा. तुमचा वेळ घ्या आणि जाणीवपूर्वक आराम करा.
पूर्ण शरीराकडे लक्ष देऊन ऊर्जाचे स्पंदन अनुभवा. आता असे समजा किंवा असे बघा की तुमचे शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरले आहे आणि ऊर्जेसह शरीराच्या आत व सभोवताली प्रकाशाचा अनुभव घ्या.
तुमचे संपूर्ण शरीर स्वस्थ करा. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तणाव, वेदना आणि रोग यापासून मुक्त आहात व अत्यंत टवटवीत आहात ह्याची खात्री करा. तुमची सर्व चक्रे ही शुद्ध व स्वच्छ आहेत आणि संपूर्ण शरीर प्रणाली ही शुद्ध व शक्तिशाली आहे याची खात्री करा. आता श्वासाची लय ओळखा. जितका वेळ तुम्हाला हवा असेल तेवढा घ्या आणि स्वस्थ रहा.
हळूहळू ह्या अवस्थेच्या बाहेर या. हळूच आपले हात, पाय व शरीराची हालचाल करा. उजव्या बाजूला वळा आणि जागे व्हा.
तुमचे डोळे अलगद उघडा.
उद्देश
झोपेचा ठराविक हिस्सा कमी करणे आणि आत्मजागृती वाढवणे आणि कोषांची ताकद वाढविणे
कोण
कोणीही आठ वर्षावरील व्यक्ती करू शकतो.
कुठे
घरात किंवा बाहेर.
कधी
दिवसभरात कधीही, उपासाच्या दिवशी केल्याने आपल्या शरीरातील व मनाच्या ऊर्जेची पातळी राखली जाते व दिवसभर आपण परमात्म्याशी जोडले रहातो.
वेळ
किमान १५ ते ३० मिनिट
फायदे
योग निद्रेच्या नियमित सरावाने आपल्याला शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक फायदे मिळतात.
झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि झोपेचा कालावधी कमी करण्यासाठी. योग निद्रेचा ३० मिनिटांचा नियमित, परिपूर्ण आणि मनापासून केलेला अभ्यास झोपेची गरज २ तासानी कमी करू शकतो.
संपूर्ण जीवन पुनरूज्जीवित करण्यासाठी
शरीरातून आणि मनातून थकवा, तणाव आणि वेदना काढून टाकण्यासाठी
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी
मनाला शांती, स्पष्टता, सतर्कता आणि शांतता आणण्यासाठी
आपल्या संवेदना आणि भावना नियंत्रणात आणण्यासाठी
एकाग्रतेची शक्ती सुधारण्यासाठी
अध्यात्मिक प्रगती जलद करण्यासाठी
जागरूकता आणि सतर्कता यांच्या विस्तारीकरणासहित ध्यानाची गुणवत्ता सुधारण्यासाठी
ध्यान करत असताना एक विचारहीन स्थिती प्राप्त करण्यासाठी
ध्यान करतेवेळी झोप टाळण्यासाठी आणि जागृत व सतर्क राहण्यासाठी
देवाच्या संपर्कात राहण्यासाठी आणि झोपेच्या आधी योग निद्रेचा अभ्यास केल्याने दैवी शक्तींशी जोडले जाण्यासाठी
तुरिया अवस्था प्राप्त करण्यासाठी (आत्मजागरूकतेची सर्वोच्च स्थिती)
योग किंवा परमात्म्याशी एकरूप होणे जो साधनेचा अंतिम उद्देश आहे, तो प्रस्थापित करण्यासाठी योग निद्रेचा उपयोग होतो.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...