श्री वशिष्ठ महर्षि

वशिष्ठ महर्षि हे ऋगवेदी ऋषी आणि अतिशय आदरणीय ऋषी आहेत. वशिष्ठ महर्षि हे भगवान ब्रम्हदेवांचे मानसपुत्र आहेत आणि म्हणूनच ते जन्माने ब्रम्हर्षि सुद्धा आहेत. ते राजा दशरथाचे मुख्य उपदेशक गुरू आणि भगवान रामांचे गुरू म्हणून ओळखले जातात. सध्याच्या मन्वंतरातील सप्तॠषींपैकी ते एक आहेत. सप्तॠषींच्या संपर्कक्षेत्रात ते कुलपती वशिष्ठ असे ओळखले जातात.
वशिष्ठ महर्षींचे वैभव शाश्वत आहे आणि ऊर्जा अमर्यादित आहेत, तरीही ते अतिशय नम्र आहेत. त्यांच्या मोहिमा या कायम गुप्त असतात आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मौन बाळगतात. त्यांचा शिष्य बनणे आणि होणे हे सोपे नाही.
ते सत्यलोकात राहतात आणि पृथ्वीवरील माऊंटअबू येथे त्यांचे वास्तव्य आहे. ते सप्तॠषी मंडळाचे प्रमुख आहेत. ते विश्वामित्र महर्षि, अत्रि महर्षि, मार्कंडेय महर्षिंसारखे एक प्रमुख महर्षि आहेत, जे महत्वाच्या प्रसंगी दैवी यज्ञ करतात. वशिष्ठ महर्षि आणि त्यांच्या पत्नी माता अरूंधतीदेवी यांनी गंगा नदीच्या तीरावर ऋषीकेशच्या बाहेर वशिष्ठ गुहेमध्ये १०० वर्षे घोर तप केले.
वशिष्ठ महर्षि हे अनेक मन्वंतरातील मानवतेच्या उद्धारासाठी अथक परिश्रम करत आहेत. त्यांचे योग वाशिष्ठ्य हे वेदांत आणि योग याची संकल्पना मांडते. योग वाशिष्ठ्य हे वशिष्ठ महर्षि आणि भगवान राम यांच्यातील संभाषणाच्या शैलीत आहे आणि त्यांत अस्तित्वाचे स्वरूप, मानवी दुःख, जीवनाचे स्वरूप म्हणून निवड, स्वतंत्र इच्छा, मानवी सर्जनशील क्षमता आणि अध्यात्मिक मुक्ती या विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे.

आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...