महासिद्ध भोगनाथर

महासिद्ध भोगर किंवा भोगनाथर, हे एक महान सिद्ध होते जे येशू ख्रिस्ताच्या ५५० ते ३०० वर्षांमध्ये पूर्वकालीन होते. पूज्य व आदरणीय अशा सिद्ध कलंगीनाथर यांच्या मार्गदर्शनाखाली तेही एक सिद्ध पुरुष बनले.
भोगनाथर सिद्ध परंपरेतील तज्ञ वैद्य होते व आदरणीय अगस्त्य महर्षी व त्यांनी इतर सिद्धांबरोबर सल्लामसलत केली व त्यांनी अनेक हजारो दुर्मिळ वनस्पतींचा वापर करून नऊ रसायने तयार केली. ह्या नऊ रसायनांचे मिश्रण करून एक महत्त्वाचे औषध तयार केले गेले. या औषधाने सर्व आजार बरे होतात. पलानी, तमिळनाडू मधील गाव, येथील मुख्य देवता मुरूगन यांची, या औषधापासून त्यांनी मूर्ती बनवली. भगवान मुरुगा या देवतेमध्ये चमत्कारी शक्ती आहे. मूर्तीला स्पर्श करणारा कोणताही पदार्थ त्याच्या उपचार शक्तींना आकर्षित करतो, अशी मान्यता आहे.
पलानी देवतेला अभिषेक किंवा धार्मिक स्नान सामान्यतः दूध, पंचामृत, इत्यादी नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. या अभिषेक द्रव्यांचे, जे अभिषेका नंतर तीर्थ बनते, त्याला प्राप्त झालेल्या उपचार शक्तीमुळे ते प्रसाद बनते. या पुतळ्याची लाखो श्रद्धावान पूजा करतात, हीच खरी भोगनाथरच्या रासायनिक पराक्रमाला दिलेली श्रद्धांजली आहे.
भोगनाथर हेच लाओत्झू होते. या झेनगुरूनी पूर्वेकडील ध्यानाचा एक लोकप्रिय प्रकार प्रसारित केला आहे. पझानी मंदिराच्या आत भोगनाथर यांची समाधी आहे. असे म्हटले जाते, की आजही महासिद्ध भोगनाथर, भगवान मुरुगा यांची विधिवत प्रकारे पूजा अर्चना करतात व गर्भगृहात फुले आणि पवित्र राख ठेवून, परत समाधी मध्ये प्रवेश करतात.
भोगनाथर यांनी त्यांच्या 'सप्तकांड' या पुस्तकात पुल्लीपाणी, या त्यांच्या शिष्याला अनेक अतिरिक्त उपचार सूत्रांची रहस्ये दिली आहेत.
भोगनाथर हेच लाओत्झू होते. या झेनगुरूनी पूर्वेकडील ध्यानाचा एक लोकप्रिय प्रकार प्रसारित केला आहे.
पझानी मंदिराच्या आत भोगनाथर यांची समाधी आहे. असे म्हटले जाते, की आजही महासिद्ध भोगनाथर, भगवान मुरुगा यांची विधिवत प्रकारे पूजा अर्चना करतात व गर्भगृहात फुले आणि पवित्र राख ठेवून, परत समाधी मध्ये प्रवेश करतात.
महाअवतार बाबाजी, पुल्लीपाणी (व्याघ्रपद महर्षी), कोंणकर्ण सिद्ध हे भोगनाथर महर्षींचे खास शिष्य आहेत.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...