विश्वामित्र महर्षि

विश्वामित्र महर्षि सर्व ऋषींमध्ये वंदनीय आहेत. साऱ्या विश्वाचे मित्र म्हणून विश्वामित्र हे नाव सार्थच आहे. या मन्वंतरामध्ये त्यांची गणना जरी सप्तऋषींमध्ये होत नसली तरी सर्व सप्तऋषी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये त्यांचा सल्ला घेतात. त्यांना ब्रह्मऋषी ही पदवी बहाल करण्यात आली आहे. ज्यांना ब्रह्मज्ञान झाले आहे, अनंत व दिव्य ज्ञान प्राप्त झाले आहे, अशांना ही पदवी देण्यात येते.
पुराणानुसार, विश्वामित्र महर्षि हे एक असे ऋषी आहेत ज्यांनी गायत्री मंत्राची रचना तर केलीच पण त्याचा अर्थही जाणून घेतला.हा ऋग्वेदातील खूप पवित्र मंत्र आहे. विश्वामित्र हे एकमेव ब्रह्मऋषी आहेत ज्यांनी तपश्चर्या करून हे पद प्राप्त केले आहे.
विश्वमित्र महर्षींनी पूर्व जन्मामध्ये देवी मातेची प्रदीर्घ तपश्चर्या केली व त्यांनी राजेशाही जीवनाचा अनुभव घेण्याचा वर मागितला. त्यांनी मागितलेले वरदान तर त्यांना प्राप्त झालेच, त्यांनी राजपुत्र कौशिक या नावाने राजा गधी यांच्या पोटी जन्म घेतला. पण देवीने त्यांना असाही वर दिला की याच जन्मात हे मोठे ऋषी होतील. राजकुमार कौशिक यांना क्षत्रिय योद्धा बनविण्यासाठी औपचारिक प्रशिक्षण देण्यात आले. पण जेव्हा आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली तेव्हा, त्यांची भेट महर्षि वशिष्ठ यांच्याशी झाली.
महर्षि वशिष्ठांच्या भेटीनंतर त्यांना ब्रम्हऋषी बनण्यासाठी ब्रम्हतेज व कर्मे जाळून नष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे महॠषी वशिष्ठांनी त्यांच्या निर्देशनास आणून दिले. विश्वामित्र महर्षींनी भगवान ब्रम्हदेवांची कठोर तपश्चर्या केली. केवळ त्यांचा जन्म मानवाच्या गर्भातून झाला होता व ते ब्रम्हदेवांचे मानसपुत्रही नव्हते म्हणून त्यांना ब्रह्मऋषी होण्यास अपात्र ठरविण्यात आले. सहजासहजी सोडून न देता,त्यांनी हार मानली नाही, आपली प्रबळ इच्छाशक्ती व दृढ निश्चयाने तपश्चर्या आणखी तीव्र केली. वशिष्ठ महर्षींनी स्वतः त्यांच्या तपश्चर्येवर लक्ष ठेवले. विश्वामित्र महर्षींनी यशस्वीरित्या आपली सर्व कर्मे जाळून टाकली व म्हणून महर्षि वशिष्ठांनी "ब्रह्मऋषी" ही पदवी त्यांना बहाल केली.
ब्रम्हाऋषी ही पदवी मिळाल्यानंतर विश्वामित्र महर्षि इतके विस्तृत झाले की त्यांची शक्ती आणि क्षमता अतुलनीय झाली. ते सृष्टीच्या कोणत्याही भागात प्रवेश करू शकत. मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी गायत्री देवीची शक्तिशाली ऊर्जा खाली धरेवर आणली, ही उर्जा निर्मितीची पहिली प्रकट उर्जा आहे. पाचव्या व सहाव्या मन्वंतरा मध्ये महर्षि विश्वामित्र हे सप्तर्षीं पैकी एक होते. त्रेतायुगात श्रीविष्णु जेव्हा रामावतार घेऊन या धरतीवर अवतरित झाले, तेव्हा त्या प्रसंगाचे सूत्रधार महर्षि विश्वामित्रच होते. विश्वमित्र महर्षि अजरामर आहेत. भगवान शंकरांनी त्यांना ध्रुव तार्यावर विशिष्ट स्थान दिले आहे.
ब्रम्हाऋषी ही पदवी मिळाल्यानंतर विश्वामित्र महर्षि इतके विस्तृत झाले की त्यांची शक्ती आणि क्षमता अतुलनीय झाली. ते सृष्टीच्या कोणत्याही भागात प्रवेश करू शकत. मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी गायत्री देवीची शक्तिशाली ऊर्जा खाली धरेवर आणली, ही उर्जा निर्मितीची पहिली प्रकट उर्जा आहे.
पाचव्या व सहाव्या मन्वंतरा मध्ये महर्षि विश्वामित्र हे सप्तर्षीं पैकी एक होते. त्रेतायुगात श्रीविष्णु जेव्हा रामावतार घेऊन या धरतीवर अवतरित झाले, तेव्हा त्या प्रसंगाचे सूत्रधार महर्षि विश्वामित्रच होते. विश्वमित्र महर्षि अजरामर आहेत. भगवान शंकरांनी त्यांना ध्रुव तार्यावर विशिष्ट स्थान दिले आहे.
शक्तिशाली असूनही महर्षि विश्वामित्र यांची नम्रता, करुणा आणि परोपकाराकरिता, जनहितार्थ काम यासाठी ते ओळखले जातात.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...