वेथाथिरी महर्षी

श्री वेथाथिरी महर्षी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९११ ला चेन्नई, तामिळनाडूच्या बाहेरील भागात असलेल्या गुडूवंचेरी गावातील एका गरीब विणकर कुटुंबात झाला.
लहानपणापासून त्यांना देव व दारिद्र्याचे कारण जाणून घेण्याची ओढ होती. त्यांची अध्यात्माची ओढ त्यांना अनेक गुरूंकडे घेऊन गेली. त्यांनी ध्यानाचा सराव वयाच्या खुप लहानपणापासून केला व त्याचा परिणाम असा झाला की ३५व्या वर्षीच त्यांना आत्म साक्षात्कार झाला.
वेथाथिरी महर्षींनी लोकांना अध्यात्म शिकवले जसे सिद्धांनी शास्रोक्त पद्धतीने शिकवले होते जेणेकरून देवावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीलाही धर्म आणि अध्यात्माचे मर्म खात्रीशीरपणे समजू शकेल. त्यांना आधुनिक सिद्धा किंवा १९वा सिद्ध असे बरेचजण समजतात.
महर्षीचा असा ठाम विश्वास होता की ध्यान आणि आत्मनिरीक्षण ही दोन मोठी साधने आहेत की ज्यामुळे माणूस स्वतःमधे परिवर्तन व शांती आणू शकतो. "वैयक्तिक शांतीद्वारे जागतिक शांती " हे त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. महर्षीची अध्यात्माची संकल्पना सर्वांसाठीच होती पण विशेषतः गृहस्थांसाठी खुप सोयीची होती म्हणून याच कारणासाठी त्यांना 'सामान्य माणसाचा तत्ववेत्ता' म्हटले जात असे.
वेथाथिरी महर्षी हे आदरणीय सिद्ध नंदीदेवर यांचे अंश आहेत. महर्षीचा असा ठाम विश्वास होता की ध्यान आणि आत्मनिरीक्षण ही दोन मोठी साधने आहेत की ज्यामुळे माणूस स्वतःमधे परिवर्तन व शांती आणू शकतो. "वैयक्तिक शांतीद्वारे जागतिक शांती " हे त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. महर्षीची अध्यात्माची संकल्पना सर्वांसाठीच होती पण विशेषतः गृहस्थांसाठी खुप सोयीची होती म्हणून याच कारणासाठी त्यांना 'सामान्य माणसाचा तत्ववेत्ता' म्हटले जात असे.
अध्यात्म, मन, जैव-चुंबकत्व, सरल शारीरिक व्यायाम आणि जागतिक शांतता यासारख्या विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली. ते कवी होते व सिद्धी आणि होमिओपॅथी औषधांचे अभ्यासक ही होते.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की रामलिंग आदिगलर (वल्लालर) नावाचे दुसरे एक मोठे संत ह्यांचे त्यांना दर्शन झाले होते आणि वल्लालर, वेथाथिरी महर्षीमध्ये १२ वर्षे विलीन झाले होते. त्या वर्षांमध्ये महर्षींनी जे काव्य रचले ते लोकांना आजही कळायला अवघड आहे. त्या कविता खरंतर वल्लालर ऋषींचे कार्य होते पण वेथाथिरी महर्षींना मिळालेली ती सुंदर भेट होती की ज्यामुळे महर्षींचे आयुष्यमान वाढले.
वेथाथिरी महर्षींनी २८ मार्च २००६ रोजी समाधी घेतली आणि जगाला समजून घेण्यासाठी व अनुकरण करण्यासाठी एक मोठा अध्यात्मिक वारसा व शिकवण ठेवून गेले.
वेथाथिरी महर्षी हे आदरणीय सिद्ध नंदीदेवर यांचे अंश आहेत.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...